💥मराठी पञकार परीषदेच्या गंगाखेड येथील राज्यस्तरीय तालूकाध्यक्ष मेळाव्याची जोरदार तय्यारी....!


💥या मेळाव्यात आदर्श तालूका संघ पुरस्कार वितरण सोहळा ही पार पडणार💥 

गंगाखेड (दि.०१ मे) - मराठी पत्रकार परिषद आयोजित तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ अध्यक्षांचा मेळावा आणि आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराचे वितरण सोहळा गंगाखेड येथे 6 मे रोजी आयोजित करण्यात आला असून गंगाखेड पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यां सोबत मराठी पञकार परीषदेच्या प्रमूख पदाधीकारी यांनी नियोजनाचा आढावा घेऊन. या मेळाव्याचे स्वागतअध्यक्ष  आ. रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन त्यांचे परीषदेच्या वतीने स्वागत करून नियोजना वर चर्चा करण्यात आली.

मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व तालुका अध्यक्ष यांचा मेळावा गंगाखेड येथे 6 मे रोजी शुक्रवारी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे व राज्यभरातून मोठ्या संख्येने पत्रकार या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थिती मध्ये पुरस्कार वितरण करण्यात येणार असून. या वेळी युवक पत्रकार विलास बडे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या अध्यक्षस्थानी  होणार असून. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी परिषदेचे पदाधिकारी गंगाखेड येथे आले असता. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आ. रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन मेळाव्या विषयी विविध व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली यावेळी संयोजक गंगाखेड तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बरोबरही सर्व नियोजनावर सविस्तर चर्चा करून हे नियोजन अंतिम टप्प्यात वेगाने सुरू असल्याचे दिसून आले व जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून आले

यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन, कोषाध्यक्ष विजय जोशी  उपाध्यक्ष सुरेश नाईकवाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल वाघमारे प्रदेश प्रतिनिधी  श्री.दिपके, पञकार संघाचे तालूकाध्यक्ष पिराजी कांबळे  पत्रकार अजित स्वामी, पञकार बाळासाहेब राखे, राहूल डोंगरे,  अंकुश वाघमारे सह आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या