💥जिंतूर तालुक्यातील सावंगी (भां.) येथील महिला दारूबंदी साठी सरसावल्या....!


💥गावातील संतप्त महिलांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे केली तक्रार💥

प्रतिनिधी जिंतूर  / बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील सावंगी भां. या गावातील अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करूनही पोलिस प्रशासन दखल घेत नाही. गावातील संतप्त महिलांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली. दारूविक्री बंद करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.

तालुक्यातील बरेच मोठमोठ्या गावामध्ये अवैध देशी विदेशी दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच सावंगी भां. या गावांमध्ये कोरवाडी, असोला, कुंबेफळ, संक्राळा, उमरद आदी गावातून लोक दारू पिण्यास येतात. बामणी पोलीस स्टेशनला याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही मात्र दारू बंद होत नाही. दारू विक्रेत्यांची गावात गुंडगिरी वाढली आहे. बामणी पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

गावातील अवैध दारु विक्री बंद करावी अशी मागणी करत महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन हे निवेदन सादर केले आहे. दिलेल्या सदर निवेदनावर कौशल्यबाई भांबळे, संगीताबाई भांबळे, अरूणाबाई चव्हाण, रत्नमालाबाई देशमुख, कौसाबाई राठोड आदी सह ५१ महिलांच्या स्वाक्षया आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या