💥पाटोद्यात पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावर जीवघेणा हल्ला....!💥हल्लेखोरांनी लोखंडी गज,दगडांचा केला सर्रास वापर💥

अतिक्रमित ईनामी दर्गाह बांधकामाचे फोटो काढले म्हणून पाटोदा येथील पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांच्यावर आज प्राणघातक हल्ला करण्यात आला.. हल्लेखोरांनी लोखंडी गज, दगडांचा सर्रास वापर केला. 

 पाटोदा शहरातील राजमहंमद चौक सांगवी रोड स्थित राजमहंमद दर्गाह मस्जिद ईनामी जमिन सर्व्हे नंबर ७१४ पाटोदा या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक यांनी घटनास्थळी जाऊन त्या बांधकामाचे फोटो काढले. या रागातून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे..

मराठी पत्रकार परिषद बीड आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या घटनेचा निषेध केला असून हल्लेखोरावर कठोर कारवाई करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या