💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील काळे परिवाराचा सामाजिक उपक्रम....!


💥सोपानराव काळे यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीच्या विकासासाठी एक लाख रुपयाची मदत💥

पुर्णा (दि.१५ एप्रिल) - तालुक्यातील धानोरा काळे येथील उपसरपंच कैलास सोपानराव काळे यांनी आपल्या वडिलांच्या तेराव्याच्या कार्यक्रमावर होणारा अनावश्यक खर्च टाळून धानोरा काळे( ता. पूर्णा) येथील स्मशानभूमी विकासासाठी एक लाख रुपयाची मदत कैलास काळे व त्यांच्या कुटुंबीयांनी देऊन एक नवा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे दिनांक २७ मार्च रोजी उपसरपंच कैलास काळे यांचे वडील माजी सरपंच तथा उपसभापती बाजार समिती ताडकळस सोपानराव(काका) बापूराव काळे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ६० व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर तेराव्या चा कार्यक्रम केला जातो परंतु कैलास काळे यांनी आई कमलबाई काळे व कुटुंबातील सदस्य सोबत चर्चा करून तेराव्या च्या कार्यक्रमासाठी होणारा खर्च कमी करून गावातील स्मशानभूमीत कोणतीही सुविधा नसल्याने याच्या विकासासाठी एक लाख रुपयाचा निधी देऊन वेगळा आदर्श निर्माण केल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. 

          सोपानराव (काका) काळे धानोरा काळे धानोरा काळे ग्रा. प.चे दहा वर्ष सरपंच होते तर ताडकळस बाजार समितीचे पाच वर्षे उपसभापती राहिले. शांत, संयमी स्वभाव सर्व समाजात आपुलकीची भावना असलेले तसेच राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे( काका) सरपंच पदावर असताना गावाला वीजपुरवठा रस्ते नाल्या यांची चांगल्या प्रकारे देखभाल करून स्वच्छता राखण्याचे काम केले मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शाळेकडे वेळोवेळी लक्ष देत अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य दिले तसेच खेळातून विद्यार्थ्यांनी पुढे यावे यासाठी वेळोवेळी स्पर्धा ठेवून विजेत्यांना स्वखर्चाने भरभरून पारितोषिक  देत असत यामुळे काका विद्यार्थी व शिक्षक प्रिय झाले.

                           सोपान काकांनी गावातील मराठा ,मातंग, बौद्ध, गोसावी, कुंभार, सुतार, लोहार,  घिसडी आधी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी लक्ष देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला गावातील मातंग समाज व बौद्ध समाजासाठी समाज मंदिर उभे केले यामुळे विविध छोटे कार्यक्रम या मंदिरात पार पडत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाला मदत झाली. धानोरा काळे हे गाव गोदावरी गंगेच्या काठावर वसलेले आहे परंतु सण १९९५-९६ या काळात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली यामुळे पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले नागरिकांना पाण्यासाठी रात्र रात्र भटकंती करावी लागायची ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्यासाठी तत्कालीन गंगाखेड पंचायत समिती समोर अमरण उपोषण करून गावाला हातपंप द्यावेत यासाठी प्रशासनाला धारेवर धरत तब्बल १९ हातपंप उभे केले विशेष म्हणजे सर्व हातपंपांना पाणी भरपूर लागल्याने त्यावेळी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व पाण्याचा मोठा प्रश्न मिटला आजच्या लोडशेडिंग काळातही हे सर्व हातपंप चालू असून मोठी जबाबदारी पार पाडत आहेत

सोपान (काका) यांचे वडील बापूराव काळे हे धानोरा काळे गावचे पहिले सरपंच झाले पुढच्या पिढीत काकाचे चिरंजीव कैलास काळे यांनी राजकारणात प्रवेश करत सन २०१९ मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण बहुमताने निवडून येत कोणतेही आमिष न दाखवता गावकऱ्यांच्या सहकार्याने विश्वास संपादन केला परंतु सरपंच पद राखीव सुटले व तीच जागा अपवाद ठरली पूर्ण बहुमत असूनही विकासाला आडकाठी येत राहिली तरीही न डगमगता प्रश्न सोडवत आहेत.

        त्यातच वडिलांचे दुःखद निधन झाले यावेळी सोपान (काका) यांच्या अंत्यसंस्कारासाठी समाजातील विविध स्तरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. वडिलांच्या तेराव्या वर होणारा खर्च टाळून गावातील स्मशानभूमी विकासासाठी एक लाख रुपयाची मदत देण्याचे कैलास काळे व त्यांच्या कुटुंबीयांनी ठरवले हा निर्णय गावासाठी अभिमानास्पद असून परिसरातील नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळून अशा सामाजिक कार्यासाठी मदत केल्यास निश्चितच फायदा होईल उपसरपंच तथा  डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पूर्णा तालुका उपाध्यक्ष कैलास काळे यांनी केलेली मदत निश्चितच प्रेरणादायी आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या