💥परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या जातीवाचक वक्तव्याचा निषेध...!


💥अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पाठवले निवेदन💥

 परभणी (दि.२१ एप्रिल) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेत जातीवाचक व धर्मद्रोही व्यक्तव्य केल्याबद्दल परभणी जिल्हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला असून मिटकरी यांना तात्काळ घटनात्मक पदावरुन काढून टाकावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.


        महासंघाचे जिल्हाध्यक्ष शंकर माधवराव आजेगांवकर, वैभव असोलेकर, शंकर भरणे, गजानन जोशी, दिपक जोशी, नारायण जोशी, दिनेश नरवाडकर, संजय जोशी वझरकर यांनी गुरुवारी (दि.20) जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना एक निवेदन सादर केले. त्याद्वारे आमदार मिटकरी यांनी एका सभेत हिंदू संस्कृतीतील दैवत हनुमान व विवाह परंपरेच्या मंत्रांचा चुकीच्या पध्दतीने उल्लेख करुन उच्चतम संस्कृतीला हीन लेखले आहे. जाती विद्वेषाचे राजकारण करतांना धर्मविषयक अनावश्यक टिप्पणी करणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पुरोहितांच्या बद्दल वारंवार आक्षेपार्ह विधाने करणार्‍या मिटकरी यांचा ताबडतोब राजीनामा घेवून त्यांना तात्काळ पदावरुन काढून टाकावे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांना सूचना द्यावी. तसेच आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, अशीही मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने निवेदनाद्वारे केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या