💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे भीम जयंती निमित्त रक्तदान शिबिर....!


💥शिबिराचे आयोजन मारुती (अण्णा) मोहिते मित्र मंडळाच्या वतीने शनिवार दि.23 एप्रिल रोजी करण्यात आले आहे💥

ताडकळस / प्रतिनिधी

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची 195 वी व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जयंतीनिमित्त ताडकळस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मारुती (अण्णा) मोहिते मित्र मंडळाच्या वतीने 23 एप्रिल वार शनिवार रोजी करण्यात येणार आहे.


या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग नोंदवावा कारण देशासाठी बलिदान समाजासाठी रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान या याप्रमाणे राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या 31 व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह ताडकळस येथे वार शनिवार रोजी सकाळी 9:35 वाजता रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर अंभोरे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून बबन (अण्णा)मुळे, माजी सभापती रंगनाथराव भोसले, सखाराम लासे,माजी सरपंच बालाजी रुद्रवार ,सरपंच गजानन अंभोरे,माजी सरपंच बालासाहेब  साखरे, दिलीपराव पवार , प्रल्हादराव होनमणे, रामराव कोळेकर ,दीपक अंभोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव हजारे ,सामाजिक कार्यकर्ते विकास आंभोरे, दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल हानवते पत्रकार मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जवळेकर ,माणिक लाकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानोबा घोडके, सुरेश मगरे , शमीन पठाण, बाळू सासवडे ,ग्रामपंचायत सदस्य जय जल्हारे ,माजी सर्कल प्रमुख प्रकाश फुलवरे, ग्रामपंचायत सदस्य आश्रोबा तुवर,रामप्रसाद आंबोरे ,सखाराम लासे ,मधुकर गाढवे आदींची उपस्थिती राहणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यास आव्हान आयोजक मारोती (अण्णा) मोहिते , बाबुराव हनुमंत, पिंटू घोडके, विलास जाधव ,कैलास मगरे, रवी मोरे ,सुरेश गायकवाड,बालाजी डाळे,सचिन मगरे,प्रशांत शिंदे, बाबासाहेब कांबळे, आनंद काळे ,राम कस्तुरे,माऊली शिराळे, बालाजी गोदे,शाहू तनपुरे रामेश्वर भोसले,सुदाम शिंदे,सुरेश गायकवाड, नारायण जाधव,भास्कर पावडे ,साहेब पवार ,बाळू गेजगे आदींनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या