💥मटका जुगाराचे धंदे सुरू ठेवण्यासाठी लाच घेणारा लाचखोर पोलीस आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात....!💥औरंगाबाद येथील वाळूज पोलिस स्थानकातील घटना💥

औरंगाबाद : येथील वाळूज पोलिस स्थानकात कार्यरत लाचखोर पोलिस शिपाई मोहम्मद सलीम हैदर शेख या लाचखोराने एका ३२ वर्षीय तक्रारदाराकडून चक्क मटका जुगाराचे धंदे सुरू ठेवण्यासाठी दि.०८ एप्रिल २०२२ रोजी १० हजार रुपयांची लाच मागितली होती या संदर्भात संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी रितसर तक्रार दाखल केल्याने त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सदरील कारवाई सापळा अधिकारी दिलीप साबळे, पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक डॉ.राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल खांबे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद व सापळा पथकातील पोलिस नायक भिमराज जिवडे,पोलीस नाईक वाघ,चालक पोलिस शिपाई बागुल,थिटे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांनी यशस्वी केली आहे......

⭕भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास

टोल फ्री क्र:- 1064

मा.पोलीस अधीक्षक, 

ला.प्र.वि. औरंगाबाद:- 8888807299 संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या