💥पुर्णेत आज बुधवार दि.२० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन...!


💥शहरातील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम,जप यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री गरूचरित्र पारायन सोहळ्यास प्रारंभ💥

पुर्णा (दि.२० एप्रिल) - शहरातील अमृत नगर परिसरातील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने आज बुधवार दि.२० एप्रिल २०२२ रोजी  श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथीचे औचित्य साधून दुपारी ०४-०० वाजेच्या सुमिरास श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या पालखी सोहळ्यास अमृत नगर येथील श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्र येथून सुरूवात होणार असून शहरातील आनंद नगर चौक,महाविर नगर,महात्मा बसवेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,संत शिरोमनी नरहरी महाराज चौक या मार्गावरून वाजत गाजत श्री.समर्थ नामाचा जयघोश करीत मार्गक्रमन करीत निघालेल्या या पालखी सोहळ्याची सांगता दत्तनगर परिसरातील श्री.दत्त मंदिर देवस्थान येथे होणार आहे.


श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने श्री.स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त भव्य श्री.स्वामी समर्थ पालखी सोहळ्यासह गुरूवार दि.२१ एप्रिल ते गुरूवार दि.२८ एप्रिल २०२२ पर्यंत अखंड नाम,जप यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री.गुरूचरित्र पारायन सोहळ्याचे आयोजन ही करण्यात आले असून यात गुरूवार दि.२१ एप्रिल रोजी ग्रामदेवता निमंत्रण व मंडल मांडणी,शुक्रवार दि.२२ एप्रिल रोजी मंडल स्थापना,स्थापित देवता हवन,अग्निस्थापना,शनिवार दि.२३ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार,श्री गणेश याग/मनोबोध याग रविवार दि.२४ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार,श्री चंडी याग,सोमवार दि.२५ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार,श्री.स्वामी याग,मंगळवार दि.२६ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार,श्री गिताई याग बुधवार दि.२७ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार,श्री रुद्र याग,श्री मल्हारी याग गुरूवार दि.२८ एप्रिल २०२२ रोजी नित्य स्वाहाकार,बलीपुर्णाहूती व सत्यदत्त पुजन तर सकाळी १०-३० वाजता महानैवद्य व सप्ताह सांगता होणार असून आज बुधवार दि.२० एप्रिल रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्यात महिला व पुरूष सेवेकरी मंडळींसह सर्व भाविक भक्तांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून पालखी सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री.स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे..... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या