💥पुर्णेत श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ६२ रक्तदात्यांनी केले रक्तदान....!


💥यावेळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उद्घाटक विशाल कदम यांनी दिली💥


श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह निमित्त श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र अमृत नगर पूर्णा या ठिकाणी  सप्ताह सांगता निमित्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल भाऊ कदम यांची प्रमुख उपस्थिती होती त्याच बरोबर  डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व दवाखाना विष्णुपुरी नांदेड चे अधिष्ठाता डॉक्टर पुजा मॅडम व डॉक्टर निळकंठे उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अमृत नगर पूर्ण च्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख म्हणाले की विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही अद्याप पर्यंत विज्ञानाला रक्त तयार करण्यात यश आले नाही त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला रक्ताची आवश्यकता असेल तर रक्त दात्याकडून रक्तदान करूनच रक्त पुरवठा केला जातो त्यामुळे समाजात रक्तदान करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे त्यामुळे आजचा श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदानाचा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे त्यामुळे सर्व समर्थ सेवेकरी परिवार यांचे खूप खूप आभार असे मत व्यक्त करण्यात आले याप्रसंगी श्री स्वामी समर्थ परिवारातील महिला आबालवृद्ध व पुरुष सेवेकरी परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता यावेळी 62 जणांनी रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवून रक्तदान केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या