💥औरंगाबाद मधील राज ठाकरे यांच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त : 8 डिसीपीसह 2 हजार पोलिसांचा फौजफाटा होणार तैनात....!


💥औरंगाबाद संवेदनशील शहर म्हणून प्रसिद्ध आहे कुठल्याही घटनेचे येथे तात्काळ पडसाद उमटतात💥

- शिवशंकर निरगुडे - हिंगोली

औरंगाबाद (दि.२९ एप्रिल) - येथील राज ठाकरे यांची सभा घोषणे पासूनच चर्चेत आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत भोंग्यावरून फोडलेले राजकीय फटाके अजूनही राज्यात वाजतायत. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठक घेतली. मात्र, भोंग्याचा प्रश्न अजूनही निकाली निघाला नाही. राज ठाकरे यांनी भोंग्यासंबंधी दिलेली डेडलाइन संपण्यापूर्वीच एक मे रोजी, महाराष्ट्रदिनी त्यांची औरंगाबादमध्ये सभा होतेय. या सभेसाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून, कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यासाठी तब्बल आठ डिसीपींची नियुक्ती करण्यात आली आहे. निकेश खाटमोडे यांच्यासह शहरातील तीन डिसीपी आणि आणखीपाच डिसीपी असणार आहोत. सोबतच शहरात दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे.

औरंगाबाद संवेदनशील शहर म्हणून प्रसिद्ध आहे. कुठल्याही घटनेचे येथे तात्काळ पडसाद उमटतात. भीमा-कोरेगाव प्रकरणाचे शहरात असेच पडसाद उमटले होते. विशेष म्हणजे यापूर्वी औरंगाबादमध्ये अनेक दंगली झाल्या आहेत. शिवाय राज ठाकरे या सभेत वादग्रस्त बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही त्यांनी भोंग्याबद्दल अल्टीमेटम दिलाच आहे. हे सारे पाहता त्यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्या दिवशी शहरभर पोलीस तैनात राहणार आहेत. अनेकांनी राज यांच्या सभेला विरोधही केला आहे. त्यामुळे ऐनवेळी परिस्थिती चिघळायला नको, याची दक्षता आतापासूनच घेण्यात येत आहे.

राज यांच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्याचे समजते. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये. वाहन पार्किंगचे नियम पाळावेत. सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या