💥जिंतूर आगारातील बस गाड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू : केवळ 35 गाड्यावर चालतो जिंतूर आगाराचा कारभार...!


💥वरिष्ठांच्याआदेशानंतर लालपरी धावणार ग्रामीण भागात ?💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर : जिंतूर आगारातील संपावर गेलेले एसटी कर्मचारी 22 एप्रिल पासून कामावरून  परतले असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरु होण्याचा मार्ग दिसत आहे एसटी कर्मचारी विविध मागण्यासाठी 4 नोव्हेंबर पासून संपावर गेले होते. परंतु हळूहळू कर्मचारी रुजू झाले तर 22 एप्रिल पासून आज पर्यंत जिंतूर आगारात 100 % टक्के कर्मचारी हजर झाले आहेत. अशी माहिती आगार प्रमुखांनी दिली.

यामुळे औरंगाबाद, सातारा, अमळनेर, अमरावती, अकोला इत्यादी लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू आहेत. मात्र पाच महिन्यापासून बसगाड्या एकाच जागेवर उभे असल्याने रस्त्यावर उतरण्यापूर्वी या गाड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो.

सद्यस्थितीत परभणी, औरंगाबाद, लातूर, औंढा ,सेनगाव, हिंगोली बसफेऱ्या सुरळीत चालू असून वरिष्ठांच्या आदेशानुसार व ग्रामीण भागातील मागणीनुसार बस सुरळीत सुरू राहणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या पुणे, अमरावती, अमळनेर, अकोला, सातारा , तसेच पुणे 3 बसफेऱ्या व इतर प्रत्येकी एक फेरी ये-जा  सुरळीत आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पाच महिन्यापासून  ग्रामीण भागातील बस सेवा ठप्प आहे.

जिंतूर आगारातील चालक-वाहक प्रशासकीय व यांत्रिक विभाग मिळून 320 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यात चालक 130 वाहक 120 प्रशासकीय 23 यांत्रिकी 43 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे आगारातील 55 कर्मचाऱ्यावर संपकाळात बडतर्फीची कारवाई झाली होती. त्यापैकी 15 हजर तर 40  कर्मचारी लवकरच हजर होतील असे आगार प्रमुख यांनी सांगितले

जिंतूर आगारात एकूण 60 बस पैकी 10 पेंडींग तर 15 वर्कशॉप ला दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. तर 35 सुरळीत चालू आहेत. सध्या दोन हिरकणी सोलापूर -जिंतूर तर  33 साधी बस कार्यरत असल्याचे माहिती आगार व्यवस्थापक श्री विश्‍वनाथ चिभडे यांनी दिली यावेळी जिंतूर आगाराचे वाहतूक निरीक्षक श्री संदीप भांबळे हजर होते यावरून असे दिसते की जिंतूर पगाराचा कारभार सद्यस्थितीत पस्तीस गाड्यावर अवलंबून आहे.

ग्रामीण प्रवाशांना फटका :-

मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. परीक्षा आणि लग्न सराईत खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी मनमानी पद्धतीने प्रवास भाडे घेतले. सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या