💥धावत्या नंदीग्राम एक्सप्रेस मध्ये 2 वर्षीय बालकाची प्रकृती अचानक झाली गंभीर...!


💥बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास लासुर स्टेशन येथे उपचारासाठी खाली उतरून ; नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई कडे रवाना💥 

लासुर /औरंगाबाद 30 एप्रिल 

आदीलाबाद मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस मधील S-1 च्या सीट नंबर 66 ते 69 यावर एक 2 वर्षीय मुलगा बेशुद्ध आहे ही माहिती रेल्वे तील रात्रपाळी स्कॉटिग रेल्वे पोलीस यांनी रेल्वे पोलीस नियंत्रण कक्ष औरंगाबाद यांना दौलताबाद पोटूळ दरम्यान दिली.


 

हि माहिती रेल्वे पोलीस यांनी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना देऊन सहकार्य करावे असे सुचवले तात्काळ ही माहिती रेल्वे नियंत्रण कक्ष नांदेड ला काही अतिरिक्त वेळ लासुर येथे नंदीग्राम एक्सप्रेस थांबविण्यासाठी विनंती केली ती मान्यता मिळाली शिवना हॉस्पिटलचे संचालक डॉ रणजीत गायकवाड यांना माहिती देताच त्यांनी डॉ हर्षद  कोठारी सह हजर झाले 

प्रकृती गंभीर असल्याने त्यास लासुर स्टेशन येथे उपचारासाठी खाली उतरून घेत नंदीग्राम एक्सप्रेस मुंबई कडे रवाना झाली याकामी रेल्वे सेना गोल्डन गृप सदस्य मनिष मुथा स्टेशन मास्तर राजेश गुप्,रेल्वे सुरक्षा बल,रेल्वे पोलीस टिटीई यांनी सेवाकार्य केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या