💥परळीत 23 एप्रिल रोजी मी रमाई बोलतेय नाटकाचे आयोजन - बालासाहेब जगतकर


💥भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती दिना निमित्त मी रमाई बोलतेय नाटकाचे आयोजन💥    


                     
परळी (दि.१९ एप्रिल) - महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त परळीत 23 एप्रिल रोजी मी रमाई बोलते या नाटकाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक बालासाहेब जगतकर यांनी दिली आहे.     याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र परळी च्या वतीने माता रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावरील वास्तव एक पात्री नाटक मी रमाई बोलते या कार्यक्रमाचे आयोजन परळीत 23 एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी ठीक सात वाजता भीम नगर जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार समोर पटांगणात आयोजित केला असून या कार्यक्रमाचे चे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोकराव हींगे पाटील करणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे डॉक्टर प्राध्यापक विनोद जगतकर हे राहणार असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शैलेश भाऊ कांबळे हे उपस्थित राहणार आहेत तर विशेष उपस्थिती वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष भगवंत आप्पा वायबसे माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर नगरसेवक नितीन रोडे परळी नपचे कार्यालयीन अधीक्षक माननीय संतोष रोडे दैनिक मराठवाडा साथी चे संपादक सतीश शेठ बियाणी दैनिक सम्राट चे रानबा गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी नपचे स्वच्छता निरीक्षक शंकरराव साळवे पी आर पी चे मराठवाडा नेते सोपानराव ताटे मिलिंद कॉलेज चे प्राध्यापक विलास रोडे गुत्तेदार अनिल मस्के तर दैनिक वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड दैनिक लोकाशा चे प्रतिनिधी दिलीप भाऊ बद्दर दैनिक जगमित्र चे संपादक बाळासाहेब कडबाने सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ आदोडे. आर टी सी न्यूज चे संपादक वैजनाथ गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष जे के कांबळे पी सी एन न्यूज चे मोहन हावळे दैनिक दिव्य अग्नीचे संपादक प्रकाश सूर्य कर दैनिक महाराष्ट्र प्रतिमा चे संपादक ज्ञानोबा सुरवसे दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड दैनिक परळी प्रहारचे संपादक राजेश साबणे तर युवाशक्ती न्यूज चैनल चे संपादक समीर भाई इनामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी जास्तीत जास्त नागरिकांनी व बंधू-भगिनींनी मी रमाई बोलते या नाटकास उपस्थित रहावे असे आव्हान या कार्यक्रमाचे संयोजक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या