💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती' निमित्त 2 निराधार विधवा ताईंना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन भेट..!


💥एचएआरसी संस्थेमार्फत निराधार मुलीचे स्वीकारले पालकत्व💥

परभणी (दि.14 एप्रिल) - 'डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती' निमित्त होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे 2 निराधार विधवा ताईला शिलाई मशीन देण्यात आली.  


आज 'डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती' यांच्या जयंती' चे औचित्य साधून आयोजित कार्यक्रम 'एचएआरसी संचलित स्वाध्यायशक्ती अभ्यासिका' येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी 12 तास वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यास सर्व टीम सदस्यांनी चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुणे श्री शिवशंकर पोपडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 


गंगाखेड तालुक्यातील मुळी व कोद्री या दुर्गम ग्रामीण भागातील दोन निराधार दुर्धर आजारग्रस्त महिलेच्या पतीच्या मृत्यूनंतर त्या महिला अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत आहेत. यातील एका महिलेची मुलगी ही देखील दुर्धर आजारग्रस्त आहे. तिची लवकरच लातूर किंवा बीड येथील विशेष बालगृहात निवास व पुनर्वसन ची सोय करण्यात येणार आहे. 

 या दोन्ही महिलांनी शिलाई मशीन चालविण्यासाठी प्रशिक्षण घेतले असून संस्थेतर्फे आपण तिचे सर्व कागदपत्रे व घरची बिकट आर्थिक परिस्थिती आदींचा विचार करून त्या दोन्ही गरजू महिलांना शिलाई मशीन दिली. या मशीनवर ती महिला तिच्या भागात काम करून तिला कुटुंबाचा उदरनिर्वाह साठी मदत होऊ शकते. 

या उपक्रमासाठी '100/- Rs  प्रति माह डोनेशन' या नावे तयार केलेल्या ग्रुपने मोलाचा सहयोग दिला या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, ऍड चंद्रकांत राजुरे, श्री शिवशंकर पोपडे,  विशाल मुंदडा,  संदीप भंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी, गुणवंत आहिरे, ज्ञानेश्वर इक्कर, अतुल जावळे, सत्यंजय हर्षे, मल्हार कुलकर्णी, प्रा शिवा आयथळ,  रवी मौर्य, राजकुमार भामरे, मुकेश आलेगावकर, सौ अनुराधा बेर्डे यांनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या