💥तेलंगणात पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना : 100 कोटी रूपयांची आर्थिक तरतूद....!


💥मराठी पत्रकार परिषदेकडून निर्णयाचे स्वागत💥 

हैद्राबाद : तेलंगणा राज्य हे आपल्या राज्यातील पत्रकारांना मान्यता देणारे पहिले राज्य ठरले आहे. सरकारने राज्यातील १८००० पत्रकारांना मान्यता दिली आहे. या योजनेतून पत्रकारांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून महाराष्ट्र सरकारने देखील पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवावी अशी मागणी केली आहे.. 


तेलंगणा राज्यात सध्या तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाची सत्ता असून के. चंद्रशेखर हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील अठरा हजार पत्रकारांसाठी सरकारने १०० कोटी रुपये जाहीर केले आहेत. तसेच हा निधी सरकार पत्रकारांच्या कल्याणासाठी वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या आमदार के. कविथा यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं. तसेच या योजनेतून पत्रकारांचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपये मिळणार आहेत. तसेच नातेवाईकांना ५ वर्षासाठी पेन्शन म्हणून तीन हजार रुपये दिले जातील असं आमदार के, कविथा यांनी स्पष्ट केलं आहे. या योजनेनंतर राज्यातील अठरा हजार पत्रकारांना या योजनेचा फायदा होणार आहे. 

तेलंगणा सरकार हे पत्रकारांच्या कल्याणाबाबत खूप सतर्क आहे. कोरोनासाथीच्या काळामध्ये राज्यातील ६४ पत्रकारांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना राज्याने २ लाखांची मदत केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या मदतनिधीपैकी ४२ कोटींचा निधी आत्तापर्यंत खर्च झाला असल्याची माहिती आमदार के. कविथा यांनी दिली. जर एखाद्या पत्रकाराचे निधन झाले आणि त्याला मुले असतील, तर ते पदवीधर होईपर्यंत प्रत्येक मुलासाठी 1,000 रुपये सरकारकडून दिले जातील, त्यांच्या अभ्यासात अडथळा येऊ नये अशी आमची इच्छा आहे असं कविथा यांनी सांगितलं. त्याचबरोबर पत्रकाराचा अपघात झाल्यास ५०,००० रुपयांची मदत तेलंगणा सरकार देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या