💥परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रात चारा पीक व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न...!


💥प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रशांत भोसले वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले💥

परभणी :- येथील कृषी विज्ञान केंद्रात दि.१४ मार्च ते १६ मार्च २०२२ या कालावधी दरम्यान आयोजित 'शेतकरी क्षमता बांधणी प्रकल्पाद्वारे दुग्ध व्यवसाय व पशुधन व्यवस्थापन' अभियानांतर्गत 'चारा पीक व्यवस्थापन' प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रशांत भोसले, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी बहुवार्षिक चारा पिके, एकदल व द्विदल चारा पिके, हिरवा व सुका चाऱ्याच्या संतुलित पोषण या विषयावर डॉ. एस एम वानखेडे, पशुवैद्यकीय महाविद्यालय परभणी आणि डॉ. गणेश जोगदंड यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी वनामकृवि परभणी येथील दुग्धशास्त्र विभागातील चारा प्रक्षेत्रावर भेट देण्यात आली, यात चारांचे वार्षिक नियोजन तसेच बहुवार्षिक चारा पीक बद्दल डॉ. रमेश पाटील यांनी प्रक्षेत्र भेटीत मार्गदर्शन केले, यानंतर डॉ. इम्रान खान आगाई यांनी अझोला उत्पादन तंत्रज्ञान आणि हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान याबद्दल प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर मुरघास बनविणे तसेच निकृष्ट चाऱ्यावर युरिया प्रक्रिया यावर डॉ.एस ए अमृतकर, पशुपोषण शास्त्र विभाग, यांनी प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन केले. 

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ. प्रशांत भोसले, यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार कोणत्याही विषयावर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र परभणी येथे करण्यात येईल असे नमूद केले. या वेळी प्रगशील शेतकरी वैभव खुडे व ज्ञानोबा कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या