💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या....!


💥नागपूरमध्ये सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणूक अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची 7 लाखात विक्री💥

✍️मोहन चौकेकर

1.तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 100 च्या आत..राज्यभरात आज फक्त 97 तर मुंबईत फक्त  29  नव्या रुग्णांची नोंद..उपचार सुरु असलेले 1525 रुग्ण , देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण 

2. भारतात पुन्हा कोरोनाची लाट येणार? , कोरोनाच्या स्थितीबाबत केंद्राचं राज्याला पत्र, राजेश टोपे म्हणतात 'पुढच्याला ठेच मागचा सावध' कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक

3. ऊन-पावसाचा खेळ सुरूच; पुणे, सांगली, साताऱ्यात पाऊस तर विदर्भात उष्णतेच्या लाटा , पुढचे 48 तास विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर भारतातही तापमानाचा पारा वाढला  

 4.'भाजपचेच 25 आमदार आमच्या संपर्कात, त्यांना सुरक्षित ठेवा'; शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांचं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर  ,.तरीपण ते कोणत्या नशेत बोलले माहीत नाही; संजय राऊत यांचा रावसाहेब दानवेंना खोचक टोला 

5. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी, पवारांपर्यंत निरोप पोहोचवण्याचं खासदार इम्तियाज जलील यांचं आवाहन , ते आधी भाजप विरोधी असल्याचं कृतीतून सिद्ध करण्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आवाहन

6. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार.. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात एकच महिला मंत्री; तर काही मंत्री डॉक्टर, वकील काही दहावी पासही 

7. नागपूरमध्ये सरोगसीच्या नावावर दाम्पत्याची फसवणूक अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची 7 लाखात विक्री

8. दिसतो हापूस... असतो बोगस! पुण्यामध्ये बनावट हापूस आंबा दाखल, कृषी उत्पन्न समितीची व्यापाऱ्यांवर कारवाई 

9.चुरशीच्या लढतीत ऑस्ट्रेलिया महिला संघानं केला भारतीय संघाचा पराभव, मेग लेनिंगची दमदार खेळी 

10.थरार पुन्हा पाहायला मिळणार, आशिया चषकात भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार , जय शाहच एसीसीचे अध्यक्ष! एक वर्षासाठी वाढवला कार्यकाळ, एजीएममध्ये घेतला निर्णय

11.'अन्नदात्यासाठी आज अन्नत्याग', शेतकरी स्वातंत्र्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे पडणार : किसानपुत्र आंदोलन 

12.होळीत व्यापाऱ्यांची दिवाळी; कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने 20 हजार कोटींची उलाढाल  

13.Holi 2022 :  होळीनिमित्त पत्नीकडून पतीला मिळतो काठीने मार, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील अनोखी परंपरा 

14.मुंबई पोलीस आयुक्तांच्या आवाहनाला आनंद महिंद्रांचा प्रतिसाद, खटारा गाड्या हटवण्यासाठी देणार ट्रक  

15.श्रीलंकेतील अजब परिस्थिती, प्रश्नपत्रिका छापायला पेपर नसल्यानं शालेय परीक्षाच रद्द....  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या