💥बेकायदेशीर कट्टी वसुली करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करा जिल्हा उपनिबंधकांचे कृषी बाजार समितींना आदेश...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागणीला यश💥

परभणी - परभणी जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या काही आडत व्यापाऱ्यांकडून  शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करतांना ग्राममध्ये येणारे मोजमाप ग्राह्य धरले जात नाही त्यात काटा घोळ केला जातो व कापुस खरेदीमध्ये एक क्विंटल कापसामागे तीन ते चार किलो कापूस कट्टी म्हणून कापल्या जातो व इतर शेतमालाच्या खरेदीमध्ये एक क्विंटलमागे एक किलो शेतमाल कट्टी म्हणून कापल्या जातो याबाबत परभणी तालुक्यातील काही जागरुक शेतकर्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या होत्या या तक्रारीची तत्काळ दखल घेत दि. ११ मार्च २०२२ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकार्यांसह जिल्हा उपनिबंधक श्री. मंगेश सुरवसे यांची भेट घेऊन जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या आडत व्यापायांमार्फत शेतीमाल विक्री साठी आणणाऱ्या शेतकऱ्यांकडून सुरु असलेली पुर्णपणे बेकादेशीर कट्टी वसुली तात्काळ थांबवावी, शेतकऱ्यांच्या मालाचे योग्य पध्दतीने वजन करून ग्राममधील वजन ग्राहय धरावे व काटा घोळ थांबवावा या मागणीचे निवेदन दिले होते. या निवेदनात वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हयातील कृषी बाजार समितीच्या विरोधात तिव्र जनआंदोलनाचा इशारा दिला होता.

या निवेदनाची दखल घेत मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी जिल्हयातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव / सभापती यांच्या नावे पत्र काढून निवेदनात नमूद केल्याप्रमाणे अडत व्यापाऱ्यांद्वारे केली जाणारी बेकायदेशीर कट्टी वसुली तत्काळ बंद करावी, शेतमाल वजन योग्य पद्धतीने करून काटा घोळ करू नये या साठी कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्यवाही करावी तसेच वरील नियमाचे पालन न करणाऱ्या अडत व्यापाऱ्यांचे परवाने कृषी उत्पन्न बाजार समितीने तत्काळ रद्द करावे व  या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने दिनांक १२ मार्च २०२२ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी अंतर्गत येणाऱ्या सर्व आडत व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे वजन करीत असताना ग्राम मध्ये असलेले वजन ग्राह्य धरावे व काटा घोळ करू नये तसेच शेतकऱ्यांकडून बेकायदेशीरपणे सुरू असलेली कट्टी वसुली तात्काळ बंद करावी व शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वरील सर्व नियमांचे पालन करावे अन्यथा नियमांचे पालन न करणाऱ्या आडत दुकानाचे परवाने रद्द करण्यात येतील अशी नोटीस व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे. 

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था परभणी व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी यांच्या या पत्रामुळे बेकायदेशीर कट्टी वसुली व वजन काट्यातील घोळ करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या काही अडत व्यापाऱ्यांच्या मानसिकतेला लगाम बसणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शेतीमाल विक्री साठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार मानले आहेत.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, बाळासाहेब तरवट, सर्कल प्रमुख शाम भोंग, मीडिया प्रभारी नकूल होगे, शहर चिटणीस वैभव संघई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या