💥वाशिम येथील मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे उद्घाटन......!


💥एन.एस.एस.हे महाविद्यालयीन विद्यार्थी  जीवनातील अनमोल रत्न-ठाणेदार विजय झळके💥

फुलचंद भगत

वाशिम:-मातोश्री शांताबाई गोटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन वाशिम ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद  झळके यांच्या हस्ते दि.10 मार्च 2022  दत्तक ग्राम केकतउमरा  येथे करण्यात  आले.  या शिबिराचे आयोजन दिनांक 9 मार्च ते 16 मार्च या कालावधीत करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभू श्री रामचंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नारायणराव गोटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून साई शिक्षण संस्था वाशिम चे अध्यक्ष सुनील पाटील  प्राचार्या श्रीमती पंचफुलाबाई पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी अकोला येथील डॉ. केशव गोरे, अविनाश पसारकर, राजगुरू  कुठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी एस  कुबडे  त्यांची उपस्थिती होती.

               कार्यक्रमाचे सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी . आर. तनपुरे यांनी केले. त्यात त्यांनी  आठवडाभर राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती उपस्थितांना करून दिली आपल्या   उद्घाटननिय मनोगतात  विनोद शेळके यांनी व्यक्ती महत्त्वाच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना  हे एक मोठे व्यासपीठ असल्याचे त्यांनी या प्रसंगी  सांगत तिला खऱ्या अर्थाने समाजशील बनविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.  सुनील पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांनी गावात  फिरून ग्रामस्थांना आरोग्यविषयक संदेश देऊन स्वच्छता संदर्भात त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे आव्हान केले. डॉ. केशव मोरे यांनी  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकता निर्माण मोठ्या प्रमाणामध्ये करता येत असल्याचे सांगितले. अविनाश पसारकर यांनी पर्यावरण  रक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे व त्याला जोपासावी व इतरांना देखील त्यापासून प्रेरणा देण्याचे काम  या माध्यमातून करण्याचे सांगितले.  डॉ जी एस   कुबडे  मी आपल्या मार्गदर्शनात राशी यामुळे विद्यार्थी खऱ्या अर्थाने समाजशील बनत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.  नारायणराव गोटे यांनी आपल्या मनोगतात अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता पर्यावरण जनजागृती गोरगरिबांना मदत शिक्षण ग्रामस्वच्छता अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन गावाकडे एक नवा आदर्श निर्माण करण्याचे त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन बीएससी भाग एक विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा अडणे व कुमारीपूजा डोंगरदिवे  यांनी केले. उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना सहकार्य क्रम अधिकारी डॉ.  व्ही .बी चांदजकर यांनी मानले . महिला कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.एस.पाथरकर, युवा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादुर यांच्यासह  महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदा सह रासेयोचे बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या