💥हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्याती बुद्रूक येथे कुकरची शिट्टी लॉक झाल्याने कुक्करचा भयंकर स्फोट...!


💥हळद शिजवनाऱ्या कुकरचा स्फोटात चार जन गंभीर जख्मी💥


शिवशंकर निरगुडे :- हिंगोली प्रतिनिधी 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधे हळद शिजवनाऱ्या कुकरचा स्फोट झाल्याने चार जन गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत सदरील घटना सेनगाव तालुक्यातील कहाकर  बुद्रुक येथे दि.१९ मार्च २०२२ रोजी घडली आहें 


सेनगाव तालुक्यातील कहाकर बुद्रुक येथिल देवराव पोपलघट यांच्या शेतात हळद शिजवन्याचे काम सुरू होते त्यासाठी संदीप पोपळघट यांनी त्यांच्या मालकीचे कुकर शेतात आणले होते रात्रि नऊ वाजन्याच्या सुमारास देवराव पोपळघट .संदीप पोपळघट .अजय अमृता खंदारे व कांबळे असे चार जन काम करत होते त्यांनी कुकर मधे पाणी टाकले व कुकर खाली जाळ पेटवला मात्र या वेळी कूकर असलेली शिट्टीचे लॉक झाल्यामुळे काही वेळानंतर कुकर तापले नाही असे  समजून चौघेजण हि कुकर जवळ जेवणासाठी बसले अर्धा तास पेक्षा अधिक काळ होऊन देखिल शिट्टी झालीच नाही .अद्याप कुकर मधील पाणी तापले नाही असे समजून चार जन निवांत जेवन करत बसले होते 

मात्र कुकर मध्ये वाफेचा दाब येऊन कुकरचा स्फोट झाला यामध्ये कुकरच्या तीनहि टाक्या उडून बाजूला पडल्या कुकरमधील गरम पाणी व हळद या चौघाच्या अंगावर पडली या मधील हें चौघेजन गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान शेतामधून मोठा आवाज आल्याने परिसरात शेतकरी धावत घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी चौघेजन गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत दिसून आले या चौघाना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले यामध्ये कांबळे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्याना उपचारा साठी नांदेडला हलवण्यात आले आहें दोघे जन अकोला येथे तर एकास वाशिमला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या