💥राज्यपालांच्या हस्ते सेलूतील माणकेश्वर यांना मिळणार बांबु सेवक सन्मान....!


💥महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिग कोशारी यांच्या शुभ हस्ते प्रदान होणार त्यांना हा सन्मान💥

सेलू प्रतिनिधी -

सेलू : येथील प्रवीण बाबुराव माणकेश्वर यांना आदिवासी बांधवांकडून  बांबू पासून बनवलेले आकर्षक आकाशदिप सेलू परिसरात विक्री आदिवासी मंडळास सहकार्य केले म्हणून नुकताच विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या वतीने बांबु सेवक सन्मान घोषित झाला आहे

     विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर यांच्या वतीने बांबू पासून आकाश कंदील तयार केले जातात.ज्या द्वारे आदिवासी बंधू भगिनींना रोजगार उपलब्ध होतो.आर्थिक अडचणी मुळे काही धर्म त्यांचे धर्मांतर करत.पण संघाच्या या योजने मधून त्यांना रोजगार उपलब्ध होतो धर्मातर थांबते.

     या कार्यात दिवाळीच्या वेळी त्यांच्या कार्यास सहकार्य म्हणून सेलू परिसरात बांबू पासून बनवलेले आकर्षक आकाशदिप श्री प्रवीण माणकेश्वर यांनी विक्री करून या मंडळास सहकार्य केले.

त्यांच्या कार्याची पावती म्हणून हा सन्मान प्राप्त झाला आहे. हा सन्मान त्यांना दि ३ एप्रिल २०२२रोजी मा. भगतसिग कोशारी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते प्रदान होणार आहे.

      त्यांच्या या कार्यामुळे सेलू च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

सर्व सेलू वासीयांकडुन त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या