💥नानासाहेब राऊत यांची परभणी ग्रामीण जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड....!


💥प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या नियुक्तीस दिली मान्यता💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी .रामपूरकर

जिंतूर (दि.१७ मार्च) : परभणी ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नानासाहेब लक्ष्मणराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्या नियुक्तीस मान्यता दिल्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) देवानंद पवार यांनी नाना राऊत यांना जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी निवडीचे पत्र सादर केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे पत्र मुंबईत काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात म्हणजे टिळक भवनात राऊत यांना प्रदान केले. यावेळी सुरेश नागरे, डॉ. ओझाद बेग मिर्झा, काँग्रेसचे जिंतूर तालुकाध्यक्ष गणेश काजळे, संजय राठोड, विशाल बुधवंत यांच्यासह अन्य नेतेमंडळीची उपस्थिती होती. दरम्यान, काँग्रेसचे युवा नेते सुरेश नागरे यांनी एका लेखी पत्राद्वारे नाना राऊत यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्याअध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या