💥तालुका शिक्षण सवंर्धन मंडळाच्या अध्यक्षपदी शेख अखिल अहमद यांची निवड....!


💥मंडळाचे सचिव गोविंद लहाने यांनी शेख अखिल यांचे नाव अध्यक्ष म्हणून सूचित केले💥

जिंतूर / बी.डी. रामपूरकर

जिंतूर : तालुका शिक्षण सवंर्धन  मंडळाचे कार्यालय एकलव्य बालविद्या मंदिर येथे संवर्धन मंडळाची बुधवार दि १० मार्च रोजी बैठक संपन्न होऊन त्यात मंडळाच्या अध्यक्षपदी तुराबूल हक्क उर्दू शाळा चारठाणा येथील मुख्याध्यापक शेख अखिल अहमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

           विद्यमान अध्यक्ष म. वा. लुटे हे नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यामुळे मंडळाचे सचिव गोविंद लहाने यांनी शेख अखिल यांचे नाव अध्यक्ष म्हणून सूचित केले तर त्यास श्रीमती अलका वासमतकर आणि संतोष साखरे यांनी अनुमोदन दिले. शेख अखिल हे तुराबुल हक्क उर्दू हायस्कूल चारठाणा या विद्यालयाचे मुख्याध्यापक असून तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम केले जाईल आणि विद्यार्थ्याच्या हिताचे उपक्रम राबवले जातील हा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या