💥भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह ४२ पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल...!


💥मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना जबाब नोंदविण्यासाठी पाठविलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ निदर्शन💥

सोलापूर : मुंबई पोलिसांनी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जबाब नोंदविण्यासाठी पाठविलेल्या नोटिशीचा निषेधार्थ भा.ज.पा. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरातील कन्ना चौक व आंध्रदत्त चौक येथे निदर्शने केली प्रकरणी भा.ज.पा.चे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह ४२ जणांविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा धोका अजूनही संपूर्णपणे संपलेला नाही तरीही, जनहित धोक्‍यात घालून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होईल असे कृत्य करून भाजपाच्या लोकप्रतिनिधींसह कार्यकर्त्यांनी सोलापूर महापालिका आयुक्‍तांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे त्याप्रकरणी देशमुख यांच्यासह ४२ जणांच्या विरोधात जेलरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तसेच त्यांनी 'देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो; हम तुम्हारे साथ है,सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है,अशी घोषणाबाजी करीत नोटिशीची होळी केली होती आमदार विजयकुमार देशमुख,अनिल कंदलगी, प्रशांत फत्तेपूरकर, पांडुरंग दिड्डी,इंदिरा कुडक्‍याल,रुद्रेश बोरामणी, सिध्दू मुनाळे, आनंद गोसकी, रामचंद्र मुटकेरी, संजू कोळी यांच्यासह इतर १२ जणांचा समावेश आहे दुसरीकडे रामचंद्र जन्नु,नागेश सरगम, गणेश पेनगोंडा, अंबादास बंगी, दत्तात्रय पोसी, व्यंकटेश कोंडी, जय साळुंखे, श्रीनिवास जोगी यांच्यासह इतर दहा ते १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, सहायक फौजदार दत्तात्रय देवमाने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या