💥राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या सेलू तालुका अध्यक्षपदी सुरवसे तर युवा तालुकाध्यक्ष पदी दिपक बच्छिरे यांची निवड...!


💥संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा💥

सेलू प्रतिनिधी -

सेलू येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाची रविवारी झालेल्या बैठकीत सेलू तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात सेलू तालुका अध्यक्षपदी सुरवसे तर युवा तालुकाध्यक्ष पदी दिपक बच्छिरे यांची निवड करण्यात आली रविवार रोजी ठीक 11:30 वाजता राष्ट्रसंत सद्गुरु श्री. संत रविदास महाराज मंदिर सर्वोदय नगर, सेलू.येथे बैठक झाली. 

संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजाच्या विविध प्रश्नांवर  सविस्तर अशी पाहुण्यांच्या द्वारे सहविचार चर्चा झाली.यामध्ये सेलू तालुका नविन कार्यकारिणी निवड , मंदिराचे राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करणे,आणि 16 मे रोजी बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी संत रविदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे असे जाहीर करण्यात आले

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा.श्री. सहादू ठोंबरे ,मराठवाडा कर्मचारी अध्यक्ष,मा.श्री.नरहरी सोनवणे मराठवाडासंघटक, मा.श्री.माधवरावजी गायकवाड ,माजी जिल्हाध्यक्ष,मा.श्री. पंढरीनाथ धोंगडे जिल्हाध्यक्ष, तसेच मानवत- पाथरी- सेलू विभागाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मा. श्री.ठोंबरे मुरलीधरराव. यांची प्रमुख उपस्थितीत सेलू तालुका नविन कार्यकारिणी उपस्थित चर्मकार बांधवामधून गठित केली.यामध्ये नवनिर्वाचित सेलू तालुका अध्यक्ष श्री.सुरवसे रामू ज्ञानोबा,तालुका उपाध्यक्ष श्री.पुरभे पुरणजी, तालुका सचिव श्री.सिल्लोडे रमेश मोतीराम,तालुका कर्मचारी अध्यक्ष श्री. घायाळ नामदेव सर तालुका सल्लागार श्री. पंडित बालासाहेब सर, तालुका महिला अध्यक्षा सौ. हाळणे मंगल बालासाहेब, तालुका युवा अध्यक्ष श्री. दिपक बच्छिरे,तालुका युवा उपाध्यक्ष श्री.पानझाडे वैजनाथ,तालुका युवा सहसचिव पानझाडे महादेव या वरील प्रमाणे तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते सर्वांचे शाल व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.तसेच पाहुण्यांच्या हस्ते सर्वांचे शाल व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व नव निर्वाचित सदस्यांनी मंदिराच्या राहिलेल्या अपूर्ण कामासाठी आपापल्या परीने देणगी नगदी स्वरूपात दिली.या देणगीत जवळपास 27,500/- रुपये जमा झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.घायाळ नामदेव सर यांनी केले व आलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि समाज बंधू भगिनींचे आभार श्री.भारत काठोटे यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या