💥सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षेचा निकाल केला जाहीर.....!


💥गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या संख्येने विद्यार्थी निकाल जाहीर करण्याची मागणी करत होते💥

✍️ मोहन चौकेकर 

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावीच्या प्रथम टर्मच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे यावेळी बोर्डाने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर करण्याऐवजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल आणि स्कोअरकार्ड मेल केले आहे. 

सर्व विद्यार्थी त्यांच्या शाळेत CBSE इयत्ता दहावी टर्म 1चा निकाल पाहू शकतात. माहितीनुसार, बोर्डाकडून अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वर देखील निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

बोर्डाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२१ मध्ये पहिली टर्म परीक्षा घेतली होती. असं पहिल्यांदाच होत आहे की बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेतली जात आहे. 

CBSE दहावी टर्म 2 परीक्षा 26 एप्रिल 2022 पासून सुरू होईल आणि 24 मे 2022 रोजी संपेल, तर बारावी टर्म 2 च्या परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होतील आणि 15 जून 2022 रोजी संपतील. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या संख्येने विद्यार्थी निकाल जाहीर करण्याची मागणी करत होते. त्यानंतर CBSE ने विद्यार्थ्यांचे निकाल शाळांना मेलद्वारे पाठवले आहेत.....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या