💥वैद्यकीय पात्रता परीक्षेत बाजी मारून कोळंबी च्या विद्यार्थ्यांने केले गावाचे नाव रोशन...!


💥शेतकरी पुत्राचे एम.बी.बी.एस.निवडीने कौतुकाचा वर्षाव💥

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील खोऱ्यात वसलेल्या कोळंबी या टुमदार गावाचे पिढीजात शेतकरी दिनेश गोवर्धन चव्हाण यांच्या मुलाचे वैद्यकीय कॉलेज रत्नागिरी येथे एम. बी. बी. एस. पदवी शिक्षणासाठी निवड झाल्याने रोशन ह्या मुलाने कोळंबी ह्या गावाचे नाव काढले असल्याची चर्चा ग्रामवासीयात व म.नाथ तालुक्यामध्ये चर्चिली जात आहे.


               दिनेश गोवर्धन चव्हाण यांना दोन मुले असून आपल्या मुलाच्या शिक्षणाप्रती अतिशय जागरूक असलेल्या चव्हाण यांच्या रोशन या मोठ्या मुलाचे प्राथमिक शिक्षण मंगरूळपीर येथील नगर परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण रोशन याने कारंजा लाड ला पूर्ण केले.रोशन दिनेश चव्हाण यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेमध्ये (निट) ७२० पैकी ५०३ गुण मिळविल्याने रोशन चव्हाण याला रत्नागिरी जिल्ह्यातील वालावलकर ग्रामीण वैद्यकीय कॉलेज व हॉस्पिटल येथे वैद्यकीय शिक्षणासाठी (एम.बी. बी. एस.) प्रवेश मिळाल्याने गावकरी व विशेषतः तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण झाली आहे.रोशन दिनेश चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांचा नागरिक मोठ्या प्रमाणात सत्कार करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या