💥मनसेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; मनसेच्या १६ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजन...!


💥यावेळी प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी मनसेच्या जिल्ह्यातील कार्याचा लेखाजोखा विषद केला💥


फुलचंद भगत

वाशिम - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या स्थानिक अकोला नाका स्थित कार्यालयात आयोजीत रक्तदान शिबीराला मनसे सैनिक व युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. हरिदास मुंडे तर अध्यक्षस्थानी माजी सैनिक मोतीराम बन्सोड यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून घे भरारी अकॅडमीचे संचालक प्रा. गोपाल वांडे, वाहतुक सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन वैरागडे, प्रा. अजय गवारगुरु, माजी शहराध्यक्ष कृष्णा इंगळे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष रघुनाथ खुपसे, मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रणजित सरनाईक, डॉ. हनुमान नानोटे, पत्रकार संदीप पिंपळकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन रक्तदान शिबीराला प्रारंभ करण्यात आला.


प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी मनसेच्या जिल्ह्यातील कार्याचा लेखाजोखा विषद केला. व सामाजीक उपक्रमासह संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात देण्यात महाराष्ट्र सैनिक कटीबध्द असल्याची ग्वाही दिली. यावेळी पार पडलेल्या शिबीरामध्ये मनसे सैनिक व युवकांनी उस्फुर्त सहभाग घेत रक्तदान केले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन वैरागडे यांनी केले. कार्यक्रमाला संगीता चव्हाण, सिता धंदरे, बेबी कोरडे, वंदना अक्कर, प्रतिक कांबळे, वेदांत ढवळे, आशिष टोलमारे, उमेश टोलमारे आदींची उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरामध्ये मोहन कोल्हे, गणेश इंगोले, गजानन वैरागडे, नकुल दाभाडे, प्रकाश कवडे, स्वप्नील खरात, महादेव तनपुरे, मनिष डांगे, विठ्ठल लांडकर, राहुल अक्कर, मंगेश देशपांडे, राधेश्याम डोंंगरे, सुनिल अवगण, प्रविण जाधव, श्रीकांत इंगोले, महेश कदम, सुदर्शन बरडे, गौरव कोल्हे आदीं रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेदांत ढवळे, सुहास जाधव, श्री देशमुख, अमर कानडे, रितेश देशमुख, पवन सावके, शंकर राऊत, डोईफोडे आदींनी परिश्रम घेतले. रक्त संकलनाकरीता सरकारी रुग्णालयाचे रक्तपेढी वैज्ञानिक सुहास फुके, मोहन सोनटक्के, विश्वजित भगत यांनी सहकार्य केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या