💥शहीद दिनानिमित्त डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून पूर्णेत शहिदांना अभिवादन...!


💥यावेळी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून अभिवादन रॅलीचे ही आयोजन करण्यात आले होते💥


पुर्णा (२३ मार्च) - डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया कडून आज २३ मार्च रोजी शहीद दिना निमित्त शहिदांना अभिवादन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात २३ मार्च १९३१ ला शहिद सरदार भगतसिंग,राजगुरू,सुखदेव यांना अत्याचारी इंग्रजांकडून फासावर चढवण्यात आले होते. आज त्यांच्या हुतात्मा दिनी पूर्णेतील युवक संघटना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डिवायएफआय) कडून त्यांना क्रांतीकारी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पूर्णेतील सर्व तरुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन तेथून रॅली काढत म.बसवेश्वर चौक मार्गे छ. शिवाजी महाराज चौक येथे जाऊन अभिवादन सभा घेण्यात आली. या अभिवादन सभेस डी वाय एफ आय चे जिल्हासचिव कॉ. नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष तसेच पूर्णा सचिव कॉ.अमन जोंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. या अभिवादन सभेला संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य व तसेच तालुक्यातील तरुणही उपस्थित होते ज्यात पूर्णा तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे जिल्हा व तालुका कोषाध्यक्ष जय एंगडे, जिल्हा सदस्य संग्राम नजान, प्रबुद्ध काळे, आकाश भगत, किरण खंदारे, सुमित वेडे, गंगाधर गायगोधने, राज जोंधळे, तथागत सोनवणे, खंबरशील जोंधळे, विशाल खंदारे- तालुकध्यक्ष रिपब्लिकन सेना, कुंदन ठाकूर आदी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या