💥कालवश ग्यानबाराव रणवीर यांच्या चौथ्या पुण्यानुमोदना निमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद....!


💥या नेत्र तपासणी शिबीरात तब्बल चारशे नेत्र रुग्नांनी नेत्र तपासणी केली💥


पूर्णा (दि.१४ मार्च) :- येथील पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी इंजिनीयर पी.जी.रणवीर व रणवीर परिवाराने कालवश ग्यानबाराव रणवीर यांच्या चौथ्या पुण्यानुमोदना निमित्त शहरातील पाटबंधारे वसाहतीत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.या शिबीराचे उदघाटक म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो हे होते तर या शिबीरास प्रमुख अतिथी म्हणून मौलाना हाफिज शेख हसन नोमानी,जनाब मो. मुजफ्फर अब्दुल खलिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


या नेत्र तपासणी शिबीरात तब्बल चारशे नेत्र रुग्नांनी नेत्र तपासणी केली. त्यांना मोफत चष्मे औषध उपचार  केला गेला या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम.यु.खंदारे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी नेत्र तपासणी शिबिराचे महत्व विशद केले.

उपस्थितांना भोजन देण्यात आले. कार्यक्रमास साहेबराव कदम,गणेश पाटील,बाबुराव वाघमारे,शिवाजीराव थोरात,मुकुंद पाईकराव,आनंदा वाटोरे, बबन बगाटे,नागेश नागठाणे,नितीन रणवीर,वंदनाबाई रणवीर,कबीर रणवीर,सुनीता बगाटे,डॉ प्राची बगाटे आदींची उपस्थिती होती.

शिबिर यशस्वी करण्यासाठी इंजिनीयर बंटी रणवीर नितीन रनविर  ज्येष्ठ पत्रकार विजय बगाटे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या