💥रेल्वे प्रवासात अस्थमाच्या तिव्र त्रासाने बेशुद्ध पडलेल्या तरूणाचे देव माणूस रुपी डॉ.सतिश लिपणे यांनी वाचवले प्राण....!


💥सदरील घटना घटना काल बुधवार दि.२३ मार्च रोजी मराठवाडा एक्सप्रेस मध्ये घडली💥

सेलू (दि.२४ मार्च प्रतिनिधी) - देवमाणूस भेटल्या च्या अनेक दंतकथा आपण खुप वेळा ऐकतो. पण समाजात आजही अशी अनेक " देव माणसे "आहेत ती केवळ प्रसंगानुसार समाजाला समजुन घ्यावी लागतात अशीच एक सत्य घटना काल बुधवार दि. २३ मार्च रोजी मराठवाडा एक्सप्रेस मध्ये घडली. पुर्णा येथील एक २५ वर्षीय तरूण रेल्वे ने औरंगाबाद हुन पुर्णेला आपल्या गावी जात होता. जालन्याहून गाडी पुढे  आली असताना या तरूणाला अस्थम्यामुळे अचानक श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने त्याची प्रकृती गंभीर व चिंताजनक झाली.

 त्यामुळे इतर प्रवासी देखील त्याला होणारा त्रास पाहुणअस्वस्थ झाले. याच रेल्वे डब्यात शिंदे टाकळी येथे जि. प.शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री त्रिंम्बक गायकवाड यांनी परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन आपले सेलू येथील मित्र डॉ सतीश एकनाथराव लिपने यांना फोन वरून घटनेची माहिती दिली  व सेलू स्टेशनवर येण्याची विनंती केली,तो पर्यंत रेल्वेने परतुर  स्थानक  सोडले होते.डॉक्टर सतीश लिपने यांनी क्षणाचाही विलंब न करता सुनील डख यांच्या सुमीत मेडीकल वरून औषधी घेऊन कंपोडर सह स्टेशन गाठले व मराठवाडा एक्सप्रेस मधिल या श्वासोच्छ्वासाच्या गंभीर रूग्णावर रेल्वेच्या डब्यातच मोफत उपचार केले,त्यामुळे मानवतरोड स्थानकापर्यंत तो तरूण शुध्दीवर आला व त्याचे प्राण वाचले.सोबत परभणी स्थानका पर्यंत डॉ लिपने यांनी आपला कंपोडर  रूग्णा सोबत पाठवले.संबंधित तरूणांच्या आई-वडीलांनी डॉ लिपने यांच्या  सहकार्य व प्रयत्नांमुळे आमच्या मुलाचे प्राण वाचल्याचे सांगुन त्यांचे आभार मानले. 

    "रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा " मानणारे डॉ सतीश लिपने यांनी मागील वीस  वर्षांपासुन अखंडपणे आपल्या जन्मगावी शेलवाडी ता. परतुर जि. जालना येथे दररोज सकाळी ७ ते ९ या वेळेत  दोन तास ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत औषधोपचार करतात . तसेच कोरोणा काळात त्यांनी सेलू, परतुर व घनसावंगी या तीन तालुक्यात जवळपास अडीच लाख रूग्णांना "आर्सेनिक अल्बम" या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारया  गोळ्या स्वतः तयार करून रूग्णांना मोफत वाटप केल्या, तसेच लॉकडाऊनच्या काळात सेलू येथील त्यांच्या लिपने हॉस्पिटलमध्ये तीन महिने रूग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे.समाज सेवेचा वसा घेतलेल्या

डॉ सतीश लिपने यांनी रूग्ण सेवे बरोबरच ग्रामीण भागातील गरजु शेतकऱ्यांना  मोफत बीबियीणे,रासायनिक खते वाटप करून शेतकरयांचे संसार सावरले आहेत.शिवाय ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी "चंदन कन्या दान योजना "राबवुन शेकडो मुलींच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.डॉ लिपने यांच्या मोफत रूग्ण सेवा व समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या