💥पूर्णा शहरातील एक सर्वमुखी नाव : राजेंद्रजी कमळू उर्फ पेंन्टरबाबू....!


💥जेष्ठ नेते आंबेडकरी विचारवंत श्री प्रकाश कांबळे यांनी आपल्या लेखणीतून आपल्या या मित्राला वाहिलेली श्रध्दांजली💥


पुर्णा शहरातील राजेंद्रजी कामळू उर्फ पेंन्टरबाबू यांचे आज मंगळवार दि.१६ मार्च रोजी सकाळच्या सुमारास पुणे येथे दुःखद निधन झाले अत्यंत मनमिळावू स्वभाव व हरहुन्नरी कलावंत तसेच आपल्या स्वभावाने प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण करणारे वादळ आज अचानक शमल्यामुळे प्रत्येक जळ हळहळ व्यक्त करीत आहे.रिपाईचे जेष्ठ नेते आंबेडकरी विचारवंत श्री प्रकाश कांबळे यांनी आपल्या लेखणीतून आपल्या या मित्राला वाहिलेली श्रध्दांजली....

    त्याने कार्यक्रमाचे बॅनर रंगविले,पोस्टर रंगविले,अनेकांच्या घरावर सुभाशिते रंगविले,कार्यालयाचे फलक रंगविले, नुसते कागदावर,कापडावर,भिंतीवरच रंग रंगविले नाहीत तर,अनेकांच्या जीवनात रंग रंगविण्याचं काम राजेंद्र कमळू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.तसे या कुटुंबीयातील सर्वच लोक,आप्तेष्ट आणि नातेसंबंधी यांनी लोकहिताचे कामात अग्रस्थानी स्थान पटकाविले.राजेंद्र कमळू यांचा स्वभाव अत्यंत मनमिळवू,मितभाषी,निर्भीड आणि लोकहिताचा !

       गांधीवादी नेते अण्णा हजारे यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव होता,त्यांनी आग्रहाने मला आणि कांही सहकार्याऱ्यांना घेऊन, राळेगण सिद्धी येथे अन्ना हजारे यांच्या गावाला नेले,तेथे कमळुनी त्यांच्याकडे कांही भ्रष्टाचाराची प्रकरणे सोपवून एक पत्र मुख्यमंत्री यांचे नावे देण्याचा आग्रह केला,पण अण्णांचा कल पाहून ते निराश झाले,त्यांना तिथेच काळे गोरे पाहिल्यानंतर  ते कमालीचे निराश झाले,पुन्हा त्यांनी त्यांचे नाव गाव आपल्या तोंडून काढले नाही,असा हा माझा मित्र आपल्या हृदयाशी भांडत भांडत आम्हाला अचानक सोडून गेला,बातमी ऐकली आणि नि:शब्द झालो,बातमीवर विश्वासच बसेना,अनेक शांतता सभातून शहरातील वेदना मांडणारा हा माझा मित्र मूक झाला,नव्हे जगाचा निरोप घेऊन मुक्तच झाला,याचे

मनस्वी दुःख वाटते, त्याच्या सोबतचे अनेक प्रसंग आज डोळ्यासोबत चलचित्राप्रमाणे येत आहेत,ते जीवंत असेपरर्यंत येत राहतील,

   मित्रा,आज तू आमच्यातून गेलास,पण आज पासून तू पुन्हा पुन्हा आमच्या मनात,आमच्या जिभेवर खेळत राहशील,

हीच तुला मनो भावाची श्रद्धांजली...!!

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या