💥मंगरुळपीर लगतच्या पंचशिल नगर जवळची दुर्दैवी घटना ; ट्रकखाली चिरडुन एकाचा जागीच मृत्यु....!


💥पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन ट्रकचालकास घेतले ताब्यात💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-भरधाव आलेल्या ट्रकसमोर अचानक एकजन आल्याने चिरडुन जागीच ठार झाल्याची घटना मंगरुळपीर लगतच्या पंचशिलनगरजवळ घडली असुन घटनेची माहीती समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवुन ट्रकचालकास ताब्यात घेतले.पंचनामा करुन मृतदेह ऊत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.


              मंगरूळपीरलगतच्या पंचशिल नगर प्रवाशी निवारातून नॅशनल हायवे 161 वर ट्रक च्या समोर  एकजन आडवा आल्याने ट्रकखाली चिरडुन ठार झाल्याची घटना घडली आहे.सदर मृतकाचे नाव पंकज बोरकर असल्याचे कळते.मिळालेल्या माहीतीनूसार नॅशनल हायवे 161 वरून ट्रक क्रमांक एम पी 07 - HB5076 हा कारंजा कडून मंगरुळपीर कडे जात असतांना मंगरुळपीर नजीक च्या पंचशिल नगर येथील प्रवाशी निवार्‍यात बसून असलेला सुकळी येथील पंकज बोरकर  चालत्या  ट्रक समोर आडवा  धावल्याने ट्रकखाली येवुन चिरडुन जागीच ठार झाला असून मंगरूळपीर पोलीसांना घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.मृतकास ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकेने ऊत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मंगरूपीर येथे पाठवण्यात आले असून ट्रक चालकास अटक करण्यांत आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या