💥मंगरुळपीर न.प.कर्मचारी पतसंस्था अध्यक्षपदी राजेश संगत तर सचिवपदी रमेश शृंगारे यांची अविरोध निवड...!


💥या निवडणुकीत कर्मचारी एकता पॅनेलचे सर्वच उमेदवार विजयी झाले💥

(फुलचंद भगत)

वाशिम (दि.१३ मार्च) :- मंगरुळपीरर येथील नगर परिषद कर्मचारी पतसंस्था निवडणूक दि.१० मार्च रोजी पार पडली असून या पार पडलेल्या पतसंस्था निवडणूकीमध्ये कर्तव्यदक्ष स्वच्छता निरीक्षक राजेश संगत यांची अध्यक्षपदी,उपाध्यक्ष राजू क्षीरसागर तर सचिवपदी रमेश शृंगारे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडणुकीत कर्मचारी एकता पॅनेलचे सर्वच उमेदवार विजयी झाले असुन या विजयाचे श्रय मुरलीधर गोदूवाले ,राजेश खंडेतोड गौतम शृंगारे,मोहन संगत,याना जाते या निवडणुकीत  संचालक पदी सुरेश ठक,गौतम दंडे, बबन खिराडे, नरशिंग चरावंडे, सुनिल शृंगारे, वसंता खोडके, रश्मी टांक, संगीता संगत  याची निवड करण्यात आली आहे.सदस्यांची निवडणूक प्रक्रिया तालुका सहकारी देखरेख संघाचे कार्यालयात पार पडून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात आले यामध्ये उल्लेखनीय बाब अशी की निवडणुकीत कर्मचारी एकता पॅनेलचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यामुळे पतसंस्था निवडणुकीवर कोणताही आर्थिक खर्च होऊ न देता निवडणूक पार पाडण्यात आली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या