💥जिंतूर येथील सर सय्यद अहेमद खान उर्दू प्राथमिक शाळेत स्वयंशासन दिन करण्यात आला साजरा...!


💥कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार एस.के.अहेमद हे होते💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी. रामपूरकर

आज दिनांक 17 मार्च 2022 रोजी सर सय्यद अहेमद खान उर्दु प्रा. शाळा जिंतूर येथे स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. एस. के. अहेमद हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन पठाण शहजाद खान (अध्यक्ष- जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघ ) यांची उपस्थिती लाभली स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापिका हुनेका जबीन सय्यद नईमोद्दीन तर उपमुख्याध्यापक सय्यद सालेम सय्यद मुखीद यांनी काम पाहिले

यावेळी सातवीचा विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत ब्यला केले. यावेळेस वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्या -ध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे एका दिवसासाठी काम केले. एका दिवसासाठी प्रशासन चालविण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व संस्थेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अयाज खान यांनी केली तर आभार प्रदर्शन अब्दुल अजिम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या