💥हिंगोली जिल्ह्यातील पत्रकार शिवशंकर निरगुडे यांनी मानुसकीची भावना जोपासत पक्ष्यांसाठी उभारले कृत्रिम पाणवठे...!


💥सेनगांव तालुक्यातील हिवरखेडा येथील युवा पत्रकार शिवशंकर निरगुडे यांचे कौतुकास्पद कार्य💥


हिंगोली (दि.१० मार्च) - सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत असुन तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या उन्हाच्या कडाक्यामुळे पक्ष्यांचे प्राण जाऊ नये यासाठी मानुसकीची भावना जोपासत काही पक्षीमित्र पक्ष्यांसाठी सर्वत्र कृत्रिम पाणवठे उभारत असून पत्रकार शिवशंकर निरगुडे यांनी सुध्दा मानुसकीची भावना जोपासत पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे उभारले आहेत.


हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगांव तालुक्यातील हिवरखेडा येथील युवा पत्रकार शिवशंकर निरगुडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत हिवरखेडा परिसरात अशा प्रकारचे पक्ष्यांसाठी हे कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत १० ठिकाणी हें पाणवठे झाडाला बांधून लावले आहेत .दरवर्षी नित्य नियमाने उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारचे कृत्रिम पाणवठे तयार करून पशु पक्ष्यांची तहान भागवत आहेत त्यामुळे यांच्या या उपक्रमावर परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.हि कलाकृती गोडतेलाच्या पीप्या पासून तयार केली आहें त्यामधे पाणी आणि गहू तांदूळ टाकले आहेत त्यामुळे आत्ता पक्ष्यांची पाण्याची आणि खाण्यासाठी देखील व्यवस्था झाली आहें....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या