💥मंगरुळपीर येथे भाजपा व्यापारी आघाडी तर्फे पाणपोईचा शुभारंभ....!


💥ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप रत्नपारखी यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले💥

फुलचंद भगत

वाशिम:-जीवाची लाही लाही होत असलेल्या ऊन्हात वाटसरुंची तृष्णातृप्ती व्हावी या ऊदात्त आणी सेवाभावी हेतुने मंगरूळपीर येथे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील मालपाणी द्वारा संचालित पाणपोईचा शुभारंभ शनिवार दिनांक 19 रोजी करण्यात आला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप रत्नपारखी यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

             नेहमी सामाजिक कार्यातुन आपला ठसा ऊमटवणारे लोकहितवादी नेतृत्व म्हणून प्रचलित असणारे जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते तथा भाजपाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मालपाणी यांनी लखलखत्या ऊन्हात वाटसरुंना प्यायला थंड पाणी मीळावे या दृष्टीकोणातुन गेल्या अनेक वर्षापुर्वीपासुन पाणपोई चालवण्याचा सामाजिक प्रयत्न याही वर्षी पुर्णत्वास नेवून थंड आरओचे फिल्टर पाणी लोकांना पाजण्यासाठी यंदाही पाणपोई सुरु केली आहे.याप्रसंगी प्रमुख्याने पुरुषोत्तम चितलांगे,श्याम खोडे,प्रा. वीरेंद्रसिंह ठाकुर,रविन्द्र ठाकरे,गोपाल बाहेती,मनिशभाई संघवी,सुमित मुंदरे,ऋतिक कनोजिया मुकेश,शिंदे गजेंद्र बजाज,सुनील राठोड,गोपाल खोडके,उज्वल मिश्रा,सतीश राठी,गोपाल वर्मा,मो शरीक,अभिषेक दंडे,महेश अहिरकर,महादेव विश्वकर्मा,रवी कथले,शरद गावंडे इत्यादि व्यापारी,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते, दरवर्षी नागरिकांना शुद्ध व थंड जल वितरित करन्याच्या शुद्ध भावनेतून पाणपोई ची सुरुवात करण्यात आली आहे यंदा फिल्टर केलेले थंड व शुद्ध पाणी वितरित करावयाचे आहे असे मनोगत सुनील मालपाणी यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या