💥जिंतूर तालुक्यातल्या बहुचर्चित औद्योगिक वसाहतच्या चेअरमन पदी धरमचंद आच्छा यांची बिनविरोध निवड...!


💥विजयी झालेल्या संचालकांच्या आजच्या पहिल्या बैठकीत संस्थेच्या चेअरमन पदी आच्छा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड💥

जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी.रामपूरकर

फेब्रुवारी महिन्यात गाजलेल्या जिंतूर तालुका औद्योगिक वसाहत च्या नूतन संचालकांच्या बैठकीत आज भाजपचे जुने ज्येष्ठ कार्यकर्ते धरमचंद मोतीलाल अच्छा यांची आज बिनविरोध निवड घोषित करण्यात आली बहुचर्चित जिंतूर तालुका औद्योगिक वसाहतीची निवडणूक 27 फेब्रुवारी 2022 रोजी संपन्न झाली या निवडणुकीत तेरा संचालकांपैकी बारा संचालक विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या विचाराचे निवडून आले विजयी झालेल्या संचालकांच्या आजच्या पहिल्या बैठकीत या संस्थेच्या चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध धरमचंद अच्छा यांचे नाव सुचवले गेले व त्या सर्वांनी अनुदान देऊन त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर पंडीत दराडे भाजपाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत शहराध्यक्ष दत्ता कटारे  आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान चेअरमन पदाची निवड झाल्यामुळे या निवडणुकीचा विषय आता पूर्णपणे संपला आहे याच निवडणुकीच्या निमित्ताने सर्व जिल्हाभरात राजकीय वातावरण तापल्याने गरमागरम चर्चा झाली होती. आच्छा यांची निवड  झाल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या