💥पूर्णा तालुक्यातील फुलकळस सोसायटीची बिनविरोध निवड....!

   


💥माजी सरपंच डिगांबर शिराळे,दत्तराव शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली फुलकळस सोसायटीची बिनविरोध निवड💥             

पूर्णा (दि.१६ मार्च) :- तालुक्यातील फुलकळस येथील सोसायटीवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.फुलकळस विविध विकास सेवा सहकारी संस्था सोसायटी निवडणूकिसाठी अर्ज करण्याचा दिनांक १५ मार्च वार  मंगळवार रोजी शेवटचा दिवस होता.दुपारी ३ वाजेपर्यंत १३ जागांसाठी फक्त १३ अर्ज आले. निकाल व अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख मार्च शेवटच्या आठवड्यात आहे. विरोधात एकही अर्ज आला नसल्याने सध्या तरी बिनविरोध च्या दिशेने कल दिसत आहे . गावकऱ्यांनी गुलाल उधळून, हार घालून व पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा केला.

सर्वसाधारण कर्जदार आठ असून दोन जागा महिलांसाठी राखीव इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती तीन जागा आहेत शिराळे डिगांबर पिराजी, सलगर भगवान गंगाराम, शिवणकर शोभाबाई धन्यकुमार, शिराळे भागवत खंडोजी, नावकीकर देवानंद गणपतराव, शिराळे सखाराम बापूराव, शिराळे गजानन हरिहर ,सरकाळे बबन नरोजी ,महिला राखीव मिसाळ उज्वला देवराव ,कुबडे शिवनंदा संजय ,इतर मागास वर्गीय स्वामी शिवहार सारंग, गलांडे सुरेश भाऊराव, धूळशेटे पिराजी बापुराव ,या १३ जणांचे उमेदवारी अर्ज पूर्णा येथे निवडीसाठी आलेले आहेत. सर्व बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचे गावातील नागरिकांनी हार घालून सत्कार केला यावेळी उपस्थित फुलकळस ग्रामपंचायत चे माजी सरपंच दत्तराव शिराळे, शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, सरपंच प्रतिनिधी तथा सदस्य विकास गव्हाळे, उपसरपंच प्रतिनिधी पशुपती शिराळे, सुधाकर शिराळे,विठ्ठलराव कुबडे, विलास शिराळे, संजय कुबडे, ग्रामपंचायत सदस्य मन्मथ नावकिकर, उमाकांत शिराळे,पांडुरंग मोरताटे,विठ्ठल शिराळे, वियज शिराळे, दिलीप शिराळे,गजानन कुबडे,बालाजी शिराळे, सटवाजी शिराळे, ज्ञानोबा सलगर,नागनाथ स्वामी,विश्वनाथ सरकाळे,संतोष धूळशेटे, वचिष्ट मिसाळ, विकास शिराळे, संतोष पुरी,महेश शिराळे, मारोती शिराळे, प्रसाद शिराळे,नारायण शिराळे, शिवम शिराळे, लिंबाजी कनकटे, हरी मिसाळ, निखिल शिराळे, खंडोजी शिवणकर, सोनाजी सलगर, शेख निहाल आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या