💥नंदुरबार जिल्ह्यात खाकी वर्दीतल्या मानसाने जपले मानुसकीचे नाते....!


💥जिल्ह्यात पोलीस प्रशासना कडून ३० ठिकाणी पाणपोईंची सोय💥

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असताना पोलीसांनी ३० ठिकाणी पाणपोईंची सोय करुन नागरिकांना सुखद धक्का दिला आहे जिल्ह्याची ७५% लोकसंख्या आदिवासी आहे हे विशेष नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळ्यात कित्येक लोकांचा उष्माघाताने बळी जातो या पार्श्वभूमीवर डोंगराळ व दुर्गम भागातील आदिवासी पाड्यांसह नंदुरबार,शहादा,अक्कलकुवा या  शहरातही अशा पाणपोईंची सोय करण्यात आली आहे.

पोलीस दलाच्या मदतीला असलेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून या पाणपोईंमध्ये पाणी भरले जाते व देखभाल केली जाते आणि त्यांवर तेथील बीटचा पोलीस अंमलदार देखरेख करतो जिल्हा पोलीस प्रमुख पी.आर.पाटील यांची ही संकल्पना त्यांच्या ‘टीम नंदुरबार पोलीस’ ने अंमलात आणली आहे.

     मागे एका गरीब वृद्ध इसमाला त्याचे पैसे चोरीला गेल्याने वर्गणी काढून ५० हजाराची हटके मदत केल्यामुळे चर्चेत आलेल्या नंदुरबार पोलीसांनी आता कडक उन्हाळयात आपल्या जिल्ह्यातील आदिवासी जनतेची तहान भागवण्यासाठी  पुढाकार घेतला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या