💥नरसापूर-नगरसोल एक्सप्रेस मध्ये जेष्ठ प्रवासी नागरिकाची प्रकृती अचानक बिघडली....!


💥तातडीने पुढील उपचारासाठी रुग्ण व नातेवाईक यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने खाली उतरून घेत रुग्णालयात हलविण्यात आले💥 

औरंगाबाद ; नरसापूर-नगरसोल एक्सप्रेस मध्ये जेष्ठ प्रवासी नागरिकाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्या जेष्ठ प्रवास्याला तातडीने उपचारासाठी उतरवून रुग्नालयात दाखल करण्यात आले रेल्वे सेना टीम सदस्य मनीष पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार निजामाबाद रेल्वे स्टेशन येथे रेल्वे डॉक्टर,रेल्वे सुरक्षा बल,रेल्वे सेना टीम कडून उपचार सुरू केले जात आहे


नरसापूर एक्सप्रेस रात्रीच्या 00:15 ते 25 पर्यंत पोहचणार असून प्रकृती जास्त बिघडू नये याकरिता तातडीने पुढील उपचारासाठी रुग्ण व नातेवाईक यांना डॉक्टर यांनी सल्ल्याने खाली उतरून घेत रुग्णालयात हलविण्यात आले आहे

याकरिता रेल्वे सुरक्षा बलाचे पो.नि.अरविंद शर्मा,पिएसआयइजी पवार,रेल्वे नियंत्रण कक्ष नांदेड,हैदराबाद व रेल्वे सेना टीम लासूर, औरंगाबाद व  निजामाबाद सेवाकार्य मध्ये सहभाग घेतला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या