💥सेनगाव तालुक्यातील पिंप्री बराडा येथील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणाणे केले भ्रष्ट प्रशासनाचे तोंड काळे....!


💥अल्पकालावधीतच रस्ता उखडण्यास झाली सुरूवात💥 


✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली प्रतिनिधी

सेनगाव ; तालुक्यातील पीप्री बरडा येथिल रस्त्याचे डांबरीकरणचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहें हाताने डांबर निघत आहें सदरील  मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतून होत आहें हें काम जयभोले कन्स्ट्रक्शन चिखली यांच्या मार्फत होत आहें या रस्त्याची एकुन लांबी 2.390की .मी आहें या किंमत 113.07 लक्ष आहें हें काम गेल्या अनेक दिवसा पासून डांबरीकरणाचे काम रखडलेले होते या कामाची मुदत गेल्या दोन वर्षा पुर्वीच संपून गेली आहें या कामाची सुरुवात दि 01/08/2018 काम पूर्ण होण्याची तारीख दि 31/07/2019 या कालावधीत काम पूर्ण होने गरजेचे होते मात्र ते काम त्या वेळेत पूर्ण झाले नाही आत्ता हें डांबरीकरणाचे काम चालू झाले आहें मात्र ते काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे होत आहें.

संबंधित रस्त्याचे डांबरीकरण हाताने उकरून निघत आहें मात्र या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहें सेनगाव तालुक्यातील साखरा ते साखरा तांडा या रस्त्याचे देखिल डांबरीकरणचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहें या दोन्ही रस्ते मुख्यमंत्री ग्रामसड़क योजनेतुन केले जात आहेत आधीच तर या कामाची मुदत संपली आहें मुदत संपल्यानंतर हें काम होत आहें तेही निकृष्ट दर्जाचे होत आहें  सेनगाव तालुक्यातील पिंप्री बरडा हा अतिशय दुर्गम भाग आहें  येथिलगावातील तरुणांनी हातांनी डांबरीकरण ऊकरुत असल्याचा वीडियो शोशल मीडियावर व्ह्ययलर केला आहें मा या गुत्तेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहें या संबंधित गुत्तेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई  करण्यात यावी अशी मागणी गावातील ग्रामस्थां कडून केली जात आहें...


प्रतिक्रिया :- प्रविण महाजन जिल्हा समन्वयक युवासेना हिंगोली

सेनगाव तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या बरडा पिंपरी हा 2.390 की .मी .चा रस्ता स्थानिकांच्या म्हनन्यानुसार आमदार निधीतून होते आहें मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतून हा रस्ता होत आहें आमदार तानाजी मुटकुळे साहेब यांनी या रस्त्यांसाठी निधी ऊपलब्ध करून दिला आहें हि चांगली गोष्ट आहें परंतु सदरील काम करणार गूत्तेदार अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत आहें असून ह्या रस्त्यावरील डांबरीकरण हाताने ऊखलले जात आहें असल्या नीच दर्जाचे काम किती दिवस टिकेल हा प्रश्न पडत आहें मात्र या कामाबाबत शासकीय यंत्रणा डोळेझाक का करत आहें सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या