💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाचे अपडेट बातम्या....!


💥आमदारांची चांदी ; निधीत एक कोटींची घसघशीत वाढ,पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला💥

✍️ मोहन चौकेकर

1. मनसे आक्रमक, मुंबईत IPLची बस फोडली! ताज हॉटेलसमोरील घटना ,IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण; हक्क नाही मिळाला तर यापुढेही तोडफोड करण्याचा इशारा 

2. शेतकऱ्यांची बँक बनली नेत्यांवर मेहेरनजर करणारी बँक.. जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या संस्थेचे कोट्यवधीच्या कर्जाचं व्याज माफ.. सांगली जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

3. आमदारांची चांदी! निधीत एक कोटींची घसघशीत वाढ, पीए आणि ड्रायव्हरचा पगारही वाढवला, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा 

4. दारुड्यांची तक्रार, पण पोलिसच 'टाईट'; नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी, दारुड्यांच्या तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकांना दुहेरी मनस्ताप.. मद्यधुंद पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप , पोलीस आयुक्तांकडून थेट निलंबनाची कारवाई 

5. सांगली-कोल्हापूर पूरग्रस्ताच्या मदतीवर अधिकाऱ्यांचा डल्ला! उस्मानाबादमधील गंभीर प्रकार समोर 

6. पंजाबमध्ये 'आप' पर्व सुरू; भगवंत मान यांनी घेतली मुख्यमंत्रपदाची शपथ , शपथविधी सोहळ्याला भगवंत मान यांच्या दोन्ही मुलांची उपस्थिती, सात वर्षांनंतर झाली भेट 

7. प्रमोद सावंत यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा संधी..  तब्बल सहा दिवसांच्या चर्चेनंतर प्रमोद सावंतांच्या नावावर पक्षश्रेष्ठीचं शिक्कामोर्तब.. यावेळी कुणीही उपमुख्यमंत्री नसणार 

8.  मुंबई, पुण्यासह काही ठिकाणी 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणाचा खोळंबा, काही ठिकाणी लसीचा पुरवठा न झाल्याचं कारण तर काही ठिकाणी अॅपवर स्लॉट उपलब्ध नसल्याची सबब 

9. गेल्या 24 तासात देशात 2,876 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 98 जणांचा मृत्यू , राज्यात मंगळवारी 207 नव्या रुग्णांची नोंद तर 2,295 रुग्णांवर उपचार सुरू 

10. भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य , चक दे झुलन! वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारी पहिली महिला क्रिकेटर 

11.SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेला वेळेतच केंद्रावर उपस्थित रहा! अन्यथा प्रवेश नाकारला जाणार, बोर्डाचा महत्वाचा निर्णय 

12.Maharashtra Holi Guidelines : होळी, धुळवडीसाठी सरकारकडून नियमावली जारी

13.Farmers suicides : पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या स्मृतीपित्यर्थ किसानपुत्रांचा 19 मार्चला मेळावा, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी 

14.Mobile Internet : मोबाइलने याड लावलं; देशातील तरुणाई दिवसाला आठ तास असते ऑनलाइन 

15.Amravati News : तीन एकर जागेवर स्वखर्चाने हॉकीसाठी मैदान तयार केलं!        

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या