💥काश्मिरी हिंदु पंडितांवर झालेल्या अमानुष अत्याचारावरील ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी...!


💥भारतीय जनता पक्षाच्या महानगर शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर💥  

परभणी (दि.१७ मार्च) : भारतात सर्वत्र नुकताच काश्मिरी हिंदु पंडितांवर झालेल्या अमानुष अत्याचारावरील प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट करमुक्त करावा या मागणीसाठी आज गुरुवार दि.१७ मार्च २०२२ रोजी भारतीय जनता पक्षाच्या महानगर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

      यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,मोहन कुलकर्णी, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.एन. डी. देशमुख, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, मनपा सदस्य मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे, रितेश जैन, सरचिटणीस संजय रिझवानी, दिनेश नरवाडकर,  उपाध्यक्ष विजय गायकवाड, सौ. प्रभावती अन्नपुर्वे, चिटणीस संतोष जाधव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतिक पटेल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार, कामगार आघाडी संयोजक रोहित जगदाळे, मंडळ संयोजक रुपेश गोव्हाड, गणेश देशमुख, दिपक शिंदे आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

       सत्य पार्श्‍वभूमीवर आधारित तसेच या पार्श्‍वभूमीची ओळख संपूर्ण जगाला करून देणारा चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’ अशा या वास्तववादी चित्रपटाला करमुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या