💥ग्रामीण भागातील विज बिल वसुली थांबवून विज पुरवठा सुरळीत करा अन्यथा...!


💥...वीज मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकणार - राजेश गिते

.परळी वैजनाथ(वार्ताहर) :- आज विविध गावचे सरपंच आणि शेतकरी यांना सोबत घेऊन उप कार्यकारी अभियंता यांना राजेश गिते यांनी निवेदन दिले.

      सध्या परळी वैजनाथ विज मंडळा मार्फत ग्रामीण भागात शेती साठी आणि गावात पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारींचे वीज तोडणी सुरू आहे.विज मंडळाने तीन महिन्यांपूर्वी अशीच वसुली मोहीम राबवून ट्रान्स्फर बंद केले होते त्या वेळी शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणीत असताना पैसे भरून वीज सुरळीत करून घेतली होती.

          सध्या उन्हाळा सुरू आहे गावात पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे आणि अशा परिस्थितीत वीज मंडळ वसुलीच्या नावाखाली पुन्हा वीज तोडणी करत आहेत.शेतकर्यांनी तीन महिन्यांपूर्वी पैसे भरले होते आता शेतकरी अडचणीत आहे तेव्हा वीज मंडळाने ताबडतोब वसुली मोहीम थांबवून  दोन दिवसांत विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा 

       लोकनेत्या मा पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  व भाजपा पदाधिकारी आणि सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन वीज मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपा नेते राजेश गिते यांनी दिला.

        या निवेदनावर मांडवा सरपंच सुंदर मुंडे, मालेवाडी सरपंच भुराज बंधने,नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मिरवट सरपंच धुराजी साबळे, मांडवा उप सरपंच अंगदराव नागरगोजे,वडखेल उप सरपंच अविनाश चव्हाण, दशरथ गिते, बालाजी गुट्टे, ईश्वर गिते,मुजेश शेख, शिवाजी डापकर,शंकर गिते, माणिक गुट्टे,नाथराव गुट्टे, रामकिसन गिते, आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या