💥पुर्णा नगर परिषदेतील बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्र प्रकरणातील त्या बोगस अधिकाऱ्यावर कारवाई होणार का ?


💥नगर परिषद मुख्याधिकाऱ्याची खोटी सही शिक्यांचा वापर करून देण्यात आले अनेक बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्र💥 

पुर्णा (दि.२४ मार्च) - पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून रहिवासी प्रमाणपत्र नाहरकत प्रमाणपत्र जन्म मृत्यूचे आदी प्रमाणपत्रांसह आतातर बांधकाम कामगारास ९० दिवस किंवा अधिक काम केल्याचे बोगस प्रमाणपत्रे ही आता नगर परिषदेतून सहज मिळत असल्यामुळे शहरासह तालुक्यातील असंख्य लोकांनी या बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्रांच्या आधारे जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात बांधकाम कामगार म्हणून स्वतःच्या नावाची नोंद करून बांधकाम कामगारांना शासनाकडून मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यास सुरूवात केल्याचे उघड झाले आहे.


पुर्णा नगर परिषद प्रशासना मार्फत देण्यात आलेल्या बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्रावर नगर परिषद अधिकारी म्हणून नगर परिषदेत स्वच्छता निरिक्षक पदावर कार्यरत नईम खान छोटे खान यांचे नाव असून संबंधित प्रमाणपत्रावर मुख्याधिकारी म्हणून स्वाक्षरी मारण्यात आली आहे या संदर्भात स्वच्छता निरिक्षक नईम खान यांच्याशी भ्रमण ध्वनीवर संपर्क साधला असता तो मी नव्हेच ? या आवेशात नईम खान यांनी याच कार्यालयातील ओएस नंदलाल चावरे यांनी सदरील प्रमाणपत्र दिल्याचे म्हटले आहे.एकंदर आतापर्यंत २६ बोगस प्रमाणपत्र हाती लागले असून अश्या प्रकारे शेकडो बोगस बांधकाम प्रमाणपत्र देण्यात आल्याचे सखोल चौकशी अंती उघडकीस येईल या बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्रांचे प्रकरण अण्णाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष माधव दुधगोंडे रा.फुलकळस तालुका पुर्णा यांनी नगर परिषद पुर्व प्रभारी मुख्याधिकारी बि.नितेशकुमार व परभणी जिल्हा कामगार अधिकारी विद्याधर मानगावकर यांना दिलेल्या तक्रार अर्जावरून उघडकीस आले असून या बोगस बांधकाम प्रमाणपत्रां संदर्भात पुर्व प्रभारी मुख्याधिकारी नितेशकुमार यांनी नगर परिषदे कडून देण्यात आलेले बांधकाम कामगार प्रमाणपत्र बोगस असल्या संदर्भात दि.०८ मार्च २०२२ रोजी लेखी स्वरूपात पत्र दिले या पत्रावर जिल्हा कामगार अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून शंभर दोनशें रुपयात मुख्याधिकारी यांची खोदी स्वाक्षरी मारून व नगर परिषदेच्या शिक्यांचा तसेच अण्णाभाऊ साठे सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचा बोगस शिक्का बनवून सदरील बोगस बांधकाम कामगार प्रमाणपत्र देणाऱ्या नगर परिषदेतील त्या झारीतील शुक्राचार्य अर्थात बोगस मुख्याधिकाऱ्यावर सखोल चौकशी अंती जिल्हाधिकारी आंचल गोयल व जिल्हा बांधकाम कामगार अधिकाऱ्यांकडून कोणती कायदेशीर कारवाई केली जाते याकडे जनसामान्यांचे लक्ष लागले आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या