💥मर्दानी महिला मंचतर्फे महिला दिनानिमित्त सर्पमित्र सौ वनिताताई बोराडे यांचा सत्कार....!


💥यावेळी पंचायत समिती सभापती सौ सिंधूताई तायडे यांची प्रमुख उपस्थिती💥 

✍️मोहन चौकेकर                                             

चिखली: जागतिक महिला  दिनाचे औचित्य साधून मर्दानी महिला मंचच्या वतीने राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्कारप्राप्त प्रख्यांत सर्पमित्र सौ.वनीताताई बोराडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  पंचायत समिती सभापती सौ सिंधूताई तायडे, प्रजापती ब्रम्हकुमारी मंचच्या निर्मला दीदी , सुरेखा दीदी, मर्दानी मंचच्या अध्यक्षा सौ सुनीताताई भालेराव , मर्दानी मंचच्या उपाध्यक्षा सौ अलकाताई व्यवहारे, मर्दानी महिला मंचतर्फे जागतिक  महिला दिनानिमित्त  विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता.

मर्दानी मंचच्या अध्यक्षा सौ सुनीताताई भालेराव यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गौरी ठोसर तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ अनिता कुलकर्णी यांनी केले.तर आभारप्रदर्शन सौ सीमा अहिरे, सौ शिला गार्डे यांनी केले ‌. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सौ राजश्री बाहेती, सौ वर्षा चांदणे , सौ शोभा खेर्डीकर यांच्यासह मर्दानी मंचच्या सर्व सन्माननीय सदस्या यांनी परिश्रम घेतले....                                  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या