💥पुर्णेत आर्ट-ऑफ लिविंग आतंरराष्ट्रीय व्यक्ती विकास केंद्रा कडून 'दिव्य-समाज का निर्माण' तिन दिवसीय शिबीर संपन्न...!


💥शिबिरकर्त्यांकडून शहरात साफ-सफाई व स्वच्छता अभियान राबविण्यात आले💥


पुर्णा (दि.२८ मार्च) - पुर्णा शहरात आर्ट-ऑफ लिविंग आतंरराष्ट्रीय व्यक्ती विकास केंद्र यांच्या माध्यमातून "दिव्य-समाज का निर्माण या समाजहीतपर तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या अंतर्गत शहरात साफ-सफाई व स्वच्छता अभियान शिबिरकर्त्यांकडून राबविण्यात आले.यात शहरात विविध भागात जाऊन त्या ठिकाणची साफसफाई व मंदिरांची साफसफाई च समाजउपयोगी कार्य करण्यात आलं.

शिबिरकर्त्यां ची एकूण ८ पथक यात तयार करण्यात आली होती त्यात अशोक नगर,श्री गुरुबुद्धी स्वामी मठ संस्थान,संत तुकाराम महाराज मंदिर,गणपती मंदिर, व शहरातील इतर भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात प्रामुख्याने शिबिर प्रशिक्षक श्री अमोल वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरकर्ते किरण अंबेकर, ज्योती अंबेकर, अंजली गवळी,करूणा बचे,अक्षय खडसे,प्रकाश कापसे,त्रिंम्बक पळसकर,सुरेश लोखंडे, शुभम अग्रवाल, विजय दशरथे, यश डहाळे,मल्लिकार्जुन स्वामी आदींच्या नेतृत्वात एकूण ८ पथकांनी सदरील स्वच्छता शिबिर राबविले.व यांनी शिबीर पार पाडण्यासाठी मेहनत घेतली...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या