💥कारंजा येथील समाजसेविका सौ.अर्चना कदम राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानित....!


💥यावेळी सिनेअभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते सौ.अर्चना कदम यांना निसर्ग मित्र पुरस्कार 2022 देण्यात आला💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-कारंजा येथील समाजसेविका सौ.अर्चना कदम यांना नुकतेच राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने  सन्मानित सन्मानीत करण्यात आले.

               वाशिम जिल्ह्याच्या नेफडो जिल्हाध्यक्षा, पतंजली योग शिक्षिका तथा समाजसेविका सौ. अर्चना कदम  यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचा राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्कार देण्यात आला. नुकताच,अंकुशराव लांडगे सभागृह पुणे येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन भारत विकास संस्थे चा स्नेहसम्मेलन  2022 कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सिनेअभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते सौ.अर्चना कदम यांना निसर्ग मित्र पुरस्कार 2022 देण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी हजर होते.कदम यांनी संस्थेअंतर्गत  वृक्ष लागवड व संवर्धन करणे ,गरजू लोकांना कपडे वाटप, covid-19 मध्ये अन्नधान्य वाटप आवश्यक सामुग्री वाटप केले. पतंजली अंतर्गत दोन महिने कोरोना पेशंट साठी विनामूल्य ऑनलाइन योगा घेतला. त्याबद्दल, यापूर्वी सुद्धा त्यांना मागील वर्षी त्यांना भारतभूषण पुरस्कार 2021 व नारी रत्न पुरस्कार अर्चना कदम यांना मिळाले होते . महाराष्ट्र शासनाचा, निसर्गमित्र पुरस्कार 2021 , नाआदित्यजी ठाकरे यांचे हस्ते मिळाला, शांतिदूत रक्षक पुरस्कार 2021, आय पी जी डॉ विठ्ठलरावजी जाधव पुणे यांनी दिला होता.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या