💥जनशिक्षण संस्थान येथील कोट्यावधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपीस गुडगाव हरियाणा येथून अटक...!


💥गुन्हयातील मास्टरमाईड आरोपी उपेंद्र गुणवंत मुळे हा गुडगांव हरीयाणा येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने अटक💥

फुलचंद भगत

वाशिम:-पोलीस ठाणे रिसोड जि.वाशिम येथे दि. 12/05/2020 रोजी फिर्यादी श्रीमती भावनाताई पुंडलिकराव गवळी, वय 50 वर्षे, रा.रिसोड, अध्यक्षा महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व जनशिक्षण संस्था वाशिम यांनी फिर्याद दिली आहे की,आरोपी अशोक नारायणराव गांडोळे व इतर यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व जनशिक्षण संस्था वाशिम यांच्या मार्फतीने चालविले जाणारे आयुर्वेदिक बी.ए.एम.एस. महाविद्यालय, बी. फार्म, डी. फार्म व भावना पब्लीक स्कुल देगांव येथे सचिव, संचालक, कर्मचारी, सदस्य पदावर असताना सन 2008 ते जुलै 2019 पर्यंत विदयार्थ्यांची शैक्षणिक फी व शासनाकडुन मिळणारे शैक्षणिक अनुदान या मधील 18,18,40,867/-रू रक्कमेचा अपहार केला असुन अपहारीत रक्कमेमधुन स्वतःच्या फायदयासाठी वेगवगेळ्या ठिकाणी स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्या आहेत. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून अपराध क. 389/2020, कलम 406, 408, 420, 34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर तपासामधेआरोपींनी संस्थेत अनियमीतता करुन अपहारीत केलेली रक्कम 19,85,42,756/-रु असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद गुन्हयात कलम 409, 468, 471 भा.दं.वि. व भ्रष्ट्राचार प्रतिबंधक (सुधारणा) अधिनियम 2018 चे कलम 13(1)(अ)(ब),13(2) समाविष्ठ करण्यात आले आहे.नमुद गुन्हयातील आरोपींनी वि.उच्च न्यायालय खंडपिठ, नागपुर येथे नमुद गुन्हयाची प्रथम खबर रदद करण्यासाठी अर्ज केले होते. दिनांक 24/02/2022 रोजी वि.उच्च न्यायालय नागपुर यांनी आरोपींनी केलेले अर्ज रदद केले. आरोपींचे अर्ज रदद झाल्यापासुन सर्व आरोपी फरार झाले होते.

पोलीस अधिक्षक मा.बच्चन सिंग यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील मास्टरमाईड आरोपी उपेंद्र गुणवंत मुळे हा गुडगांव हरीयाणा येथे असल्याबाबत माहिती तांत्रिक तपासावरुन सायबर सेल वाशिम येथील पोना/महेश ब.न.1192, पोना.मंगेश बन.106, पोशि.प्रशात बनं.99 व पोशि गोपाल ब.नं.299 यांनी काढली. तांत्रिक माहिती प्रमाणे आरोपी शोध पथकातील 1.सपोनि.विजय जाधव स्थागुशा, 2 सपोनि.शेबडे 3.पोहेकॉ.अमोल मुंदे ब.नं.867 व 4.पोकॉ.मोहम्मद परसुवाले ब.नं.1374 पो.स्टे.मंगरुळपीर यांनी आरोपी उपेंद्र मुळे याला दि लिला इन्टरनॅशनल हॉटेल गुडगांव हरीयाणा येथुन ताब्यात घेवुन आज रोजी आरोपीस अटक करण्यात आली आहे. मा.बच्चन सिंग पोलीस अधिक्षक, वाशिम यांचे मार्गदर्शनात पुढील तपास चालु आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या